घरदेश-विदेशकेंद्रीय यंत्रणांचा वापर करून तृणमूल काँग्रेस फोडता येणार नाही; ममतांचा भाजपला इशारा

केंद्रीय यंत्रणांचा वापर करून तृणमूल काँग्रेस फोडता येणार नाही; ममतांचा भाजपला इशारा

Subscribe

केंद्रीय यंत्रणांचा वापर करून 'तृणमूल काँग्रेस' फोडता येईल, असा जर का भाजपचा समाज असेल, तर तो त्यांचा भ्रम आहे.'' असा टोला सुद्धा ममता बॅनर्जी यांनी भाजपाला दिला.

केंद्रीय यंत्रणांचा वापर करून भाजप इतर पक्षांना फोडते असा आरोप विरोधकांकडून वारंवार केला जात आहे. अशातच पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांनी शिक्षक भरती प्रकरणात गैरव्यवहार केला त्या संदर्भांत सक्तवसुली संचलनालयाने अटक केल्याप्रकरणी आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाष्य केले आहे. त्यावेळी त्या ममता म्हणाल्या, ”कोणी काही चुकीचे केल्याचे दिसून आले तर त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. पण, केंद्रीय यंत्रणांचा वापर करून ‘तृणमूल काँग्रेस’ फोडता येईल, असा जर का भाजपचा समाज असेल, तर तो त्यांचा भ्रम आहे.” असा टोला सुद्धा ममता बॅनर्जी यांनी भाजपाला दिला.

हे ही वाचा – Mamata Banerjee Mumbai Visit : ममतादीदींनी मुख्यमंत्र्यांना दिला शुभसंदेश, आदित्य ठाकरे यांची…

- Advertisement -

ममता बॅनर्जी राज्य सरकारच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होत्या. यावेळी बोलत असताना, आपल्या विरोधात बादनामीची मोहीम सुरु केल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. त्याचबरोबर आपण भ्रष्टाचाराची पाठराखण करत नाही असा दावाही ममता बॅनर्जी यांनी केला. न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. तपासातील सत्य केव्हा बाहेर आले पाहिजे, त्यावर न्यायालयाने काय निर्णय द्यावा. या संदर्भांत कालमर्यादा निश्चित असली पाहिजे. त्यात जर कुणी दोषी आढळल्यास त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण आपल्या विरुद्ध चुकीच्या हेतूने सुरु असलेल्या मोहिमेचा मी निषेध करते. असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

- Advertisement -

हे ही वाचा – ‘भाजपच्या कैदेतून मुक्त व्हा’; २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींचे जनतेला आवाहन

त्याचबरोबर शिक्षक भरती घोटाळ्याचा तपास करताना ज्याच्या घरामधून २२ कोटी रुपये एवढी रोख रक्कम जप्त करण्यात आली. त्या अर्पिता मुखर्जी यांच्या यांच्यासोबत ममता बॅनर्जी यांची बातचीत करतानाची एक ध्वनि चित्रफीत भाजपकडून जारी करण्यात आली आहे आणि त्यावरच स्पष्टीकरण देताना ममता बॅनर्जी म्हणाल्या ‘त्या महिलेशी तृणमूल काँग्रेसच कोणताही संबंध नाही. मी तिला ओळखत सुद्धा नाही. मी अनेक कार्यक्रमांना जात असते. तिथे कुणी ह्या चित्रफितीचे चित्रण केले असेल तर त्यावरून मी दोषी ठरत नाही. असे स्पष्ट विधान ममता बॅनर्जी यांनी केले.

Mamata Banerjee

हे ही वाचा – Mamata Banerjee Mumbai Visit : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत दाखल, कसा असेल…

आम्ही कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराचे समर्थन करत नाही, किंवा भ्रष्टाचाराला थारा सुद्धा देत नाही. किंवा कोणत्याही भ्रष्टाचाराला थारा सुद्धा देत नाही. केंद्रीय यंत्रणांकडून सुरु असलेला हा तपास आमच्या पक्षाला आणि मला अडकविण्यासाठी रचलेला सापळा आहे, की काय हे आम्ही पाहू. असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.

हे ही वाचा –  राष्ट्रपती पदाच्या शर्यतीतून शरद पवार बाहेर; विरोधी पक्षांच्या बैठकीत आज नव्या नावावर…

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -