घरताज्या घडामोडीममतांना धक्का! तृणमूल काँग्रेस नेते अनुब्रत मंडलांना सीबीआयकडून अटक

ममतांना धक्का! तृणमूल काँग्रेस नेते अनुब्रत मंडलांना सीबीआयकडून अटक

Subscribe

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते अनुब्रत मंडल यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. गोवंश तस्करीप्रकरणी सीबीआयने ही कारवाई केली आहे. अनुब्रत मंडल हे ममता बॅनर्जी यांचे जवळचे सहकारी आणि पक्षाचे बिरभूम जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. २०२० मध्ये गोवंश तस्करीप्रकरणी सीबीआयने बेड्या ठोकल्या आहेत.

अनुब्रत मंडल यांना सीबीआयने चौकशीसाठी दहा वेळा समन्स धाडले होते. परंतु ते चौकशीसाठी हजर राहू शकले नाहीत. परंतु सीबीआयने न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्यानंतर त्यांना अटकेची परवानगी मिळाली. आज सकाळी सीबीआयचे अधिकारी अनुब्रत मंडल यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत ३० गाड्यांचा ताफा होता. सीबीआयने त्यांच्या बंद खोलीत जवळपास दीड तास चौकशी केली. त्यांना अटक करण्यात आली असून वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.

- Advertisement -

सीबीआयने अनुब्रत मंडल यांना दोन दिवसांपूर्वीच समन्स पाठवले होते. काल(बुधवार) निजाम पॅलेस येथील सीबीआयच्या कार्यालयामध्ये त्यांना हजर राहण्यास सांगितले होते. परंतु तब्येतीचा हवाला देत ते चौकशीला हजर राहिले नव्हते. त्यामुळे आज त्यांना समन्स बजावण्यात आलं असून त्यांना अटक करण्यात आली आहे. २०१५-१७ दरम्यान सीमा सुरक्षा दलाने सीमेपार तस्करी होणाऱ्या २० हजार जनावारांना पकडलं होतं. याचप्रकरणी सीबीआयने काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील काही ठिकाणांवर छापे टाकले होते.

- Advertisement -

दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे नेते पार्थ चॅटर्जी यांना शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी अटक झालेली असतानाच आणखी एका नेत्यावर कारवाई झाल्याने ममता बॅनर्जींना मोठा धक्का असल्याचं समजलं जात आहे.


हेही वाचा : शिवसेनेच्या घोषणेनंतरही काँग्रेसला हवंय विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -