घरदेश-विदेशउपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस राहणार तटस्थ, सरचिटणीस अभिषेक बनर्जींनी केली घोषणा

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस राहणार तटस्थ, सरचिटणीस अभिषेक बनर्जींनी केली घोषणा

Subscribe

तृणमूल काँग्रेस उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सहभागी होणार नाही. कालीघाट येथील ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी पक्षाच्या सर्व लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर तृणमूलचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी TMC उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून दूर राहणार आहे. एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जगदीप धनखर यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जगदीप धनखर हे पश्चिम बंगालचे राज्यपाल असताना कसे होते हे आपल्याला माहीत आहे. त्यांनी बंगालच्या जनतेवर आणि मुख्यमंत्र्यांवर वेगवेगळ्या प्रकारे हल्ला केला. त्यामुळे आम्ही कोणत्याही परिस्थितीत एनडीएच्या उमेदवारासोबत जाणार नाही.

दोन्ही सभागृहात 35 खासदार असलेल्या पक्षाशी चर्चा न करता आणि विचारविनिमय न करता विरोधी उमेदवार ठरवण्यात आल्याने आम्ही सर्वानुमते मतदान प्रक्रियेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले. टीएमसीचे सरचिटणीस म्हणाले की, आम्ही काही नावे प्रस्तावित केली होती आणि ते सल्लामसलत करत होते. मात्र, आमच्याशी सल्लामसलत न करता नाव निश्चित करण्यात आले. अध्यक्ष किंवा उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी विरोधी एकजूट निकषांवर अवलंबून नाही. ममता बॅनर्जी यांचे मार्गारेट अल्वा यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत. मात्र, वैयक्तिक संबंधांणी काही फरक पडत नाही. दरम्यान, जगदीप धनखर यांची उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा होण्यापूर्वी, ममता बॅनर्जी आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी दार्जिलिंगच्या गव्हर्नर हाऊसमध्ये त्यांच्याशी तीन तास बैठक घेतली होती.

- Advertisement -

शरद पवारांन केली होती घोषणा –

- Advertisement -

गेल्या रविवारी 17 विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा यांच्या उमेदवारीची घोषणा करताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो शरद पवार म्हणाले की, आप आणि तृणमूल काँग्रेस या बैठकीला उपस्थित नसतील, परंतु दोन्ही पक्ष अल्वा यांना पाठिंबा देतील. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत झामुमो विरोधकांसोबत असल्याचंही शरद पवार बोलले होते.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -