घरदेश-विदेश'सायरा बानो' भाजपात प्रवेश करणार

‘सायरा बानो’ भाजपात प्रवेश करणार

Subscribe

तोंडी तलाक आणि निकाह हलाला विरोधात न्यायालयात तक्रार करणाऱ्या 'सायरा बानो' आता भाजपामध्ये प्रवेश करणार आहे.

ट्रिपल तलाक पंरपरेविरोधात न्यायालयात लढा देणाऱ्या सायरा बाने भारतीय जनता पक्षात लवकरच प्रवेश करणार आहे. सायराने आपल्या वडिलांसोबत शुक्रवारी देहरादून येथे भाजपाच्या प्रदेश अध्यक्ष अजय भट्ट व मंत्री संजय कुमार यांची भेट घेतली. आपली भाजपमध्ये सामिल होण्याची इच्छा त्यांनी भेटीदरम्यान सांगतिली. मुस्लिम महिलांना मान मिळवून देण्यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहे. प्रदेश अध्यक्ष अजय भट्ट यांनी सायराला लवकरच पक्षात सामिल करण्याचे आश्वासन दिले आहे.

ट्रिपल तलाक सारख्या मुद्यावर न्यायालयात धाव घेतल्यामुळे सायरा बानो चर्चेत आल्या होत्या. आपण उचललेल्या मुद्याची न्यायालय दखल घेत असल्याने सायरा यांनी आनंद व्यक्त केला होता. या पुढेही महिलांसाठी असाच लढा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे स्वागत करत अध्यक्ष अजय भट्टयांनी म्हटले की,”मुस्लिम महिलांसाठी त्यांनी केलल्या कामामुळे नवीन इतिहास रचला गेला आहे.”

- Advertisement -

सायरा बानो यांच्या विवाह जिवनाला १५ वर्षे पूर्ण झाली होती. मात्र एक दिवशी त्यांच्या पतीने काही मिनीटातच त्यांना तलाक दिला होता. काशीपूर येथे आपल्या वडिलांच्या घरी असताना त्यांच्या पतीने फोन वरुन त्यांना तलाक दिला होता. या घटनेमुळे सारया अतिशय दुःखी झाल्या होत्या. त्यांनी पतीविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली. फोनवरून तीनदा तलाक म्हटल्यावर महिलेशी तलाक करण्याची प्रथा इस्लाममध्ये होती. ही प्रथा काही देशांनी बंद केली तरीही भारतात ती सुरु होती. या प्रथेमुळे अनेक महिलांना त्यांचे पती फोनवरुन तलाब बोलून सोडून देत होते. या महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात सायरा यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना भाजपात प्रवेश मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -