घरदेश-विदेशत्रिपुरात पुन्हा भाजप की सत्तांतर? आज विधानसभेच्या 60 जागांसाठी मतदान सुरू

त्रिपुरात पुन्हा भाजप की सत्तांतर? आज विधानसभेच्या 60 जागांसाठी मतदान सुरू

Subscribe

त्रिपुरा राज्यातील 60 विधानसभा मतदारसंघासाठी आज ( 16 फेब्रुवारी) मतदान सुरु झाले आहे. या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. त्रिपुरातील 3,337 मतदान केंद्रांवर सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली झाली आहे, दुपारी 3 वाजेपर्यंत हे मतदान सुरु राहणार आहे. त्रिपुराची एकेकाळी डाव्या विचारसरणीचा बालेकिल्ला अशी ओळख होती, मात्र मागील विधानसभा निवडणुकीत प्रथमच या ठिकाणी भाजपने आपला झेंडा फडकावला आहे. आता भाजप येथील सत्ता अबाधित ठेवणार का, याकडे सर्वांच लक्ष लागून आहे. 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

त्रिपुरा राज्यात 3,328 मतदान केंद्रांवर मतदान सुरु आहे. यात 20.13 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या 60 विधानसभा मतदारसंघात 259 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यातील 20 महिला उमेदवार आहेत. त्रिपुरातील 1 हजार 100 मतदान केंद्र संवेदनशील तर 28 अतिसंवेदनशील आहेत. या ठिकाणी विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

- Advertisement -

त्रिपुरात 2018 मध्ये भाजपने सत्ता काबीज केली. या निवडणुकीत भाजप आयपीएफटीसोबत युती करत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर सीपीआय काँग्रेससोबत एकत्र येत निवडणुक लढवत आहे. याशिवाय माजी राजघरण्याचे वंशज प्रद्योत बिक्रम यांचा टिपरा मोथा हा पक्षही निवडणुकीच्या रिंगणात आहे. यासह ममता बॅनर्जी यांचा टीएमसी पक्षही या निवडणुकीत काही जागा लढवत आहे.

त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत 55 जागांवर भाजप निवडणूक लढवत आहे तर त्यांच्या मित्रपक्ष आयपीएफटीने 5 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. ही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी 31 हजार मतदान कर्मचारी आणि केंद्रीय दलाचे 25 हजार सुरक्षा कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले आहेत. तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सशस्त्र पोलीस आणि राज्य पोलिसांचे मोठे दल देखील सज्ज ठेवण्यात आले आहेत.


फडणवीस हे कधीच असत्य बोलणार नाहीत; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -