Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांचा राजीनामा तर माणिक साहा नवे मुख्यमंत्री

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांचा राजीनामा तर माणिक साहा नवे मुख्यमंत्री

Subscribe

देब यांनी शुक्रवारी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी आज राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर माणिक साहा यांचे त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री म्हणून नाव घोषित करण्यात आले आहे. शनिवारी रात्री किंवा रविवारी साहा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तसेच केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्यावर त्रिपुराचे पर्यवेशक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दरम्यान, देब यांनी शनिवारी राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्याआधी शुक्रवारी देब यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी आज राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली . मात्र शनिवारी सायंकाळी भाजप नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत  नवीन मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीवर चर्चा झाली.

- Advertisement -

बिप्लब देब यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार यावर  चर्चा रंगली होती.  तसेच मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांच्या स्पर्धेत डॉक्टर माणिक साहा, उप मुख्यमंत्री जिष्णु देब बर्मन आणि केंद्रीय राज्य मंत्री प्रतिमा भौमिक यांचे नावही होते.. मात्र आता मुख्यमंत्रीपद साहा यांच्याकडे गेल्याने  बिप्लब देब यांना राज्यसभेत पाठवण्यात येण्याची शक्यता आहे. याबदद्ल  मीडियाशी बोलताना बिप्लब देब यांनी पार्टी जो निर्णय घेईल तो मला मान्य असल्याचे सांगितले आहे. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतरच आपण राजीनामा दिल्याचे देब यांनी म्हटले आहे.

भाजपला पुन्हा सत्तेत आणण्यास प्राथमिकता

- Advertisement -

त्रिपुरामध्ये भाजपला दिर्घकाळ सत्तेत ठेवण्याची गरज आहे. यामुळे भाजपला पुन्हा सत्तेत आणणे ही आमची प्राथमिकता असल्याचे बिप्लब देब यांनी सांगितले आहे .  दरम्यान बिप्लब देब यांच्यावर संघटनेतील अनेक ज्येष्ठ नेते नाराज होते. याच नाराजीतून दोन आमदारांनी पक्ष सोडला होता. बिप्लब यांच्याविरोधात काही भाजप नेत्यांनी दिल्लीत तक्रारही केली होती. याचपार्श्वभूमीवर अमित शहा यांनी देब यांना राजीनामा देण्यास सांगितले असे भाजपच्या गोटात बोलले जात आहे.

 

- Advertisment -