Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी संचारबंदीतही सुरू होता शाही लग्नसोहळा, जिल्हाधिकाऱ्यांच्या एंट्रीने मिनिटात उधळला

संचारबंदीतही सुरू होता शाही लग्नसोहळा, जिल्हाधिकाऱ्यांच्या एंट्रीने मिनिटात उधळला

Related Story

- Advertisement -

संपूर्ण देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळे काही राज्यांमध्ये लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पण तरीही लोकं याकडे दुर्लक्ष करून आपले शाही कार्यक्रम थाटामाटात पार पाडत आहे. असे काहीसे त्रिपुरामध्ये घडले आहे. संचारबंदी असतानाही त्रिपुरातील दोन हॉलमध्ये थाटामाटात लग्नसोहळा सुरू होता. पण याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी दोन्ही हॉलमध्ये पोलिसांच्या फौजफाट्यासह धाड घातली आणि संपूर्ण शाही लग्नसोहळा उधळून लावला.

दरम्यान त्रिपुरामध्ये कोरोना रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सर्वसामान्यांनी रात्री १० नंतर विनाकारण घराबाहेर पडू नये असे आदेश प्रशासनाने देऊनही रात्री ११ नंतर त्रिपुरात धुमधडाक्यात लग्नसोहळा सुरू होता. याची खबर जिल्हाधिकारी डॉ. शैलेश कुमार यादव यांना मिळाली आणि त्यानंतर सगळा लवाजमा घेऊन ते लग्नस्थळी पोहोचले. गुलाब बागान आणि माणिक्य कोर्ट नावाच्या हॉलवर हा लग्नसोहळा पार पडत होता. या लग्नसोहळ्याला मोठ्या प्रमाणात लोकं उपस्थित होते. यावेळी लोकांनी ना मास्क लावला होता ना सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले होते. त्यामुळे अशी परिस्थिती पाहिल्यानंतर जिल्हाधिकारी यादव यांनी सर्वांवर कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश दिले.

- Advertisement -

तसेच यावेळी यादव यांनी एका पुजाऱ्याच्या डोक्यात सणसणीत चापटी तर नवरदेव आणि पुजाऱ्याला मानगूटीला धरून सरळ हाकलून लावले. एवढेच नाहीतर यादव यांनी या लग्नसोहळ्याबाबत स्थानिक पोलीस अधिकाऱ्याला माहिती असूनही त्यांनी कारवाई का केली नाही? याबाबत विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच त्यांनी लग्नसोहळ्याला उपस्थिती असलेले सर्व जण सुशिक्षित असूनही अशा प्रकारच्या वागण्यावर खंत व्यक्त केली. पाहा यादव यांनी कशाप्रकारे लग्नसोहळा उधळून लावला.

Curfew Na Manne ka Natija.. Tripura Saadhi

Curfew Na Manne ka Natija..Dekhiye Tripura mai ek Saadhi Main Kya Hua..

Video Credit: Tripura Talks

Posted by Indian Street Food on Monday, April 26, 2021

- Advertisement -

 


हेही वाचा – Viral Video: Corona Break! लग्नाची वरात पाहताच एम्ब्युलन्स ड्रायव्हरचा PPE KIT घालूनच ठेका


 

- Advertisement -