घरदेश-विदेशत्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब देब यांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ला; वाहनांची तोडफोड

त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब देब यांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ला; वाहनांची तोडफोड

Subscribe

त्रिपुरीचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्या घरावर आणि त्यांच्या घरी येणाऱ्या पुजाऱ्यांवर काही अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला आहे. गोमती जिल्ह्यातील उदयपूरच्या जमजुरी राजधानगर स्थित देब यांचे वडिलोपार्जित घर आहे. याच घरावर अज्ञातांनी दगडफेक केली, तसेच घराबाहेरील वाहनांची जाळपोळ केली, देब यांचे दिवंगत वडील हिरुधन देब यांच्या वर्षश्राद्धाच्या विधीसाठी हे पुजारी त्यांच्या घरी येत होते होते. त्याचवेळी हा हल्ला झाला.

यावेळी अज्ञातांनी पुजाऱ्यांवर हल्ला करत त्यांच्या वाहनांची तोडफोड केली. यावेळी स्थानिकांनी धाव घेत पुजाऱ्यांना हल्लेखोरांच्या तावडीतून वाचवले, मात्र हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. हल्लेखोरांनी देब यांच्या घरावरही दगडफेक करत खिडक्यांच्या काचा फोडल्या, त्यानंतर घराला आग लावत आजूबाजूंची घरं आणि दुकानही पेटवून दिली आहेत, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

दरम्यान देब यांच्या घराबाहेर आणि परिसरातील वातावरण शांत करण्यासाठी मोठी पोलीस फौज तैनात करण्यात आली आहे. परिस्थती हाताळण्यासाठी आता उप मंडल पोलीस अधिकारी निरुपम देबशर्मा आणि अतिरिक्त पोलीस अधिक्षक देबांजना रॉक घटनास्थळी पोहचले आहेत. सीपीएमच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेचा पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे.

माकपाच्या सरकारमधील मंत्री राहिलेले आमदार रतन भौमिक यांनी मंगळवारी या परिसरात एक बैठक घेतली होती, यानंतर सायंकाळी हा हल्ला झाला आहे. 4 जानेवारी रोजी बिप्लब देब यांच्या वडिलांच्या पुण्यतिथी आहे. त्यामुळे देब यांच्या घरी होमहवन आणि पुजाविधी होणार आहे. या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी हा हल्ला झाला. यात देब यांच्या घराला अज्ञातांकडून आग लावण्यात आली, तर परिसरातील वाहनांची, दुकानांची मोठ्याप्रमाणात तोडफोड करण्य़ात आली आहे. सीपीएमने या हल्लाचं षडयंत्र रचल्याचं सांगितले जात असून यातून विशिष्ट समुदायाच्या लोकांनी हा हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. सुदैवाने या हल्ल्यावेळी घटनास्थळी देब यांच्या कुटुंबातील कोणी सदस्य उपस्थित नव्हते. त्यामुळे कोणतीही हानी झाली नाही.


चित्रा वाघ यांना ‘चित्रू’ म्हणत उर्फीने पुन्हा डिवचलं

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -