घरट्रेंडिंगखरी भविष्यवाणी करणाऱ्या ऑक्टोपसला कापून खाल्ले!

खरी भविष्यवाणी करणाऱ्या ऑक्टोपसला कापून खाल्ले!

Subscribe

फूटबॉल विश्वचषकाविषयी खरी भविष्यवाणी करणाऱ्या जपानच्या ऑक्टोपसला विक्रीसाठी पाठवले गेले. आतापर्यत त्याने केलेल्या सर्व भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत.

जपानचा ‘ऑक्टोपस’ आणि ‘फिफा विश्वचषक’ यांचे जणू परस्परांशी अवीट असे नाते आहे. त्यामुळेच की काय, जपानच्या ऑक्टोपसकडून विश्वचषकाच्या फूटबॉल सामन्यांविषयी केल्या जाणाऱ्या भविष्यवाणी खऱ्या ठरत आल्या आहेत. २०१० मध्ये ‘पॉल द ऑक्टोपसने’ केलेली भविष्यवाणी खरी ठरल्यानंतर जगभरातील लोकांना या ऑक्टोपसचे अप्रूप वाटले होते. ‘पॉल द ऑक्टोपस’ प्रमाणेच यावर्षी ‘रैबिओट’ नावाचा ऑक्टोपस देखील चांगलाच प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याला सायचिक नावाने देखील लोक ओळखतात. त्याने यावर्षीच्या विश्वचषकात जपानशी संबंधित केलेल्या सर्व भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. परंतु, वेळ कधी कुणावर कशी येईल? हे कधीच सांगता येणार नाही आणि एक अशीच घटना ‘रैबिओट’ सोबत घडली आहे. त्यामुळे ‘रैबिओट’ आता पुन्हा जपानच्या फुटबॉल संघाचे भविष्य सांगू शकणार नाही.

काय घडले ‘रैबिओट’सोबत?

‘रैबिओट’ने आतापर्यंत ‘फिफा २०१८’ च्या विश्वचषकाविषयी केलेली संपूर्ण भविष्यवाणी खरी ठरली आहे. जपान संघाच्या ग्रुप स्टेज पासून सगळ्याच सामन्यांविषयी केलेली भविष्यवाणी खरी ठरली. मात्र, आता हा ‘रैबिओट’ एक ‘सी-फूड’ बनला आहे. त्याला ‘सी-फूड’ प्रमाणे कापून खाल्ले गेले आहे. ‘डेली मेल’ नावाच्या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ‘रैबिओट’ला जपानच्या ओबीरा, होक्काइडा येथून पकडण्यात आले होते. आतापर्यत या ‘रैबिओट’ने १०० टक्के खरी भविष्यवाणी केली आहे. तरीही, ‘रैबिओट’ला विक्रीसाठी बाजारात पाठवले गेले.

- Advertisement -

‘रैबिओट’ अशाप्रकारे करत होता भविष्यवाणी

एका स्विमिंग पूलमध्ये ‘रैबिओट’ला सोडले जायचे. त्या पूलमध्ये तीन वेगवेगळ्या प्रकरचे बकेट ठेवल्या जायच्या. एका बकेटवर जपानच नाव तर दुसऱ्या बकेटवर प्रतिस्पर्धी संघाचे नाव आणि तिसऱ्या बकेटवर ‘ड्रॉ’ असे नाव लिहिले असायचे. या तिन्ही बकेटपैकी ज्या बकेटच्या दिशेने ‘रैबिओट’ जाईल तो संघ विजयी ठरेल,अशी भविष्यवाणी वर्तविली जायची.

ऑक्टोपसची प्रत्येक भविष्यवाणी खरी ठरली आहे. सगळ्यात अगोदर त्याने जपान कोलंबियाला हरवेल अशी भविष्यवाणी केली होती. ही भविष्यवाणाी खरी ठरली. त्यानंतर त्याने जपानचा सेनेगल सोबत असणारा सामना ‘ड्रॉ’ होईल, अशी भविष्यवाणी केली होती. त्याची ही देखील भविष्यवाणी खरी ठरली. त्याचबरोबर त्याने जपानला पॉलंड विरोधात हार पत्करावी लागेल, अशी देखील भविष्यवाणी केली होती. त्याची ही भविष्यवाणी देखील अगदी खरी ठरली होती.

- Advertisement -

‘रैबिओट’चा मालक काय म्हणाला?

‘रैबिओट’चा मालक मच्छीमार किमीओ आबेने सांगितले की, ‘रैबिओटला जिवंत ठेवण्यापेक्षा मला माझा व्यावसाय जास्त महत्वाचा आहे’. रैबिओटचा मालक ५१ वर्षाचे आहेत. ओक्टोपसच्या भविष्यवाणी विषयी त्यांना आनंद असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सोशल मीडियावर फोटो होताहेत व्हायरल

सोशल मीडियामध्ये ऑक्टोपस बाजारच्या एका दुकानावर मृत ऑक्टोपस टांगले असल्याचा फोटो व्हायरल होत आहे. परंतु, हा फोटो ‘रैबिओट’चा आहे का? याची अजून शहानिशा झाली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -