घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेट...तर आर्थिक रसद बंद करु, अमेरिकेची आता WHO ला धमकी

…तर आर्थिक रसद बंद करु, अमेरिकेची आता WHO ला धमकी

Subscribe

जागतिक आरोग्य संघटनेला केला जाणारा वित्त पुरवठा बंद करु, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

कोरोना विषाणूमुळे अमेरिकेची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच जागतिक आरोग्य संघटनेसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने चीनवर अधिक लक्ष केंद्रित केलं, असा आरोप केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, ‘जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात पैसे मिळतात. जेव्हा मी चीनमधून येणाऱ्या विमानसेवेवर बंदी घातली, तेव्हा जागतिक आरोग्य संघटना माझ्याशी सहमत नव्हती आणि त्यांनी माझ्यावर टीका केली. ते बर्‍याच गोष्टींबद्दल चुकीचे होते. असं दिसतंय की त्यांचे चीनवर अधिक लक्ष आहे. त्यामुळे आम्ही जागतिक आरोग्य संघटनेवर खर्च होणाऱ्या निधीवर बंदी घालण्याच्या विचारात आहोत.

- Advertisement -

हेही वाचा – वुहान शहर ७६ दिवसांनंतर लॉकडाऊनमधून मुक्त


कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी चीनहून येणाऱ्या विमानावरील बंदीचा संदर्भ देताना ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेने माझा निर्णय चूकिचा का ठरवला? असा सवाल ट्रम्प यांनी केला आहे. “सुदैवाने चीनशी आमची सीमा लवकरच सुरू करण्याचा त्यांचा सल्ला मी नाकारला,” असं ट्रम्प म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, अमेरिकेमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. येथे संसर्ग झालेल्यांची संख्या झपाट्याने वाढत असताना मृतांची संख्याही सतत वाढत आहे. चीनमधील वुहान शहरातून तीन महिन्यांपूर्वी पसरलेल्या कोरोनामुळे आतापर्यंत अमेरिकेत १२ हजार ८५४ लोक मरण पावले आहेत. तर ४ लाख ४१२ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत, जगभरात या विषाणूमुळे १४ लाख ३१ हजार ७०६ लोक संक्रमित झाले आहेत आणि ८२ हजार ८० लोकांचा मृत्यू झाला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -