घरदेश-विदेशअमेरिकेचा भारताला दणका; ट्रम्प यांचा मोठा निर्णय

अमेरिकेचा भारताला दणका; ट्रम्प यांचा मोठा निर्णय

Subscribe

'भारतासोबतच आपण तुर्की राष्ट्राचादेखील 'कर मुक्त देश' हा दर्जा समाप्त करु इच्छितो', असंही ट्रम्प यांनी पत्राद्वारे संसदेला कळवलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे ‘जीएसपी प्रोग्राम यादी’मधून काढण्याचा निर्णय घेतला आहे. थोडक्यात अमेरिकेने भारतचा ‘कर मुक्त देश’ हा दर्जा संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशातील व्यापार करारांतर्गत हा निर्णय घेण्याता आल्याचं समजतंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी संसदेला एका पत्राद्वारे याची माहिती दिली आहे. ट्रम्प यांनी सोमवारी जाहीर केले की, ”मी प्राधान्य सामान्यीकरण प्रणाली (जीएसपी) कार्यक्रमांतर्गत विकसनशील देश म्हणून भारतासाठी मिळणारी पदवी काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेण्यामागील कारण म्हणजे भारत आणि अमेरिका दोन्ही देशातील व्यापारी संबंध दृढ असूनही, भारताने अमेरिकेला त्यांच्या बाजारपेठेत योग्य आणि न्यायपूर्ण स्थान देण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत नाही. त्यासंबंधीचं कोणतं आश्वासनही भारताकडून देण्यात आलेलं नाही.”

‘भारतासोबतच आपण तुर्की राष्ट्राचादेखील ‘कर मुक्त देश’ हा दर्जा समाप्त करु इच्छितो’, असंही ट्रम्प यांनी पत्राद्वारे संसदेला कळवलं आहे.

- Advertisement -

कर मुक्तीची सुविधा रद्द? 

ट्रम्प यांच्या निर्णयानुसार ते भारतसोबतच्या व्यापारामध्ये ५.६ बिलिअन युएस डॉलरच्या निर्यातीवरीवल कर मुक्तीची सुविधा रद्द करु इच्छितात. दोन्ही देशांमध्ये झालेल्या आर्थिक करारांतर्गत अमेरिकेकडून भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर कर मुक्तीची सुविधा दिली जाते. मात्र, ही सुविधा संपुष्टात आणण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आहे. याशिवाय ट्रम्प यांनी भारतात पाठवल्या जाणाऱ्या बऱ्याचशा अमेरिकन उत्पादनांवर भारत अतिरिक्त कर आकारतो अशी टीकादेखील केली आहे. त्यामुळे आता इथून पुढे अमेरिकेकडून भारतीय उत्पादनांवर अशाचप्रकारे अधिक प्रमाणात कर आकारला जाईल अशी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. उपलब्ध माहितीनुसार, अमेरिका भारतीय वस्तूंवरील १०० टक्के कर मुक्ती रद्द करुन, २५ टक्के कर लागू करण्याच्या विचारात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -