घरताज्या घडामोडीकरोनाच्या कचाट्यात १५ कोटी लोक सापडू शकतात; अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

करोनाच्या कचाट्यात १५ कोटी लोक सापडू शकतात; अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

Subscribe

करोनाच्या व्हायरसमुळे अमेरिकन प्रशासन हादरुन गेले असून अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

चीनच्या वुहान प्रांतातून सार्‍या जगभरात पसरलेल्या करोना विषाणूमुळे आता अमेरिकेतही भीतीचे वातावरण पसरले आहे. हा व्हायरस आता अमेरिकेतही हातपाय पसरु लागला आहे. अमेरिकेत आतापर्यंत २ हजार लोकांना करोनाची लागण झाली असून ४७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे अमेरिकन प्रशासन हादरुन गेले असून अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणीबाणीची घोषणा केली असून करोनाचा मुकाबला करण्यासाठी ५० अब्ज डॉलरची (५ हजार कोटी) तरतूद केली आहे. तसेच करोना व्हायरस रोखण्यासाठी वेळीच उपाय योजना केल्या नाहीत तर अमेरिकेतील १५ कोटी लोक या व्हायरसच्या कचाट्यात सापडू शकतात, अशी भीती ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये तातडीची पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे.

- Advertisement -

करोना व्हायरसमुळे अमेरिकेत आतापर्यंत ४७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. योग्य त्यावेळी उपाय योजना केल्या नाहीत तर अमेरिकेतील कोटी लोक या व्हायरसला बळी पडू शकतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्याचे मोठे पाऊल उचलले आहे. ‘येणाऱ्या काळात देशवासियांना मोठी किंमत मोजावी लागेल. त्यामुळे आता त्याग केला तर येणाऱ्या काळात त्याचा फायदाच होईल, असे सांगत येणारे आठ आठवडे संकटाचे असतील. तसेच अमेरिकेत आतापर्यंत २ हजार लोकांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या व्हायरसचे अमेरिकेसारख्या विकसित आणि सुविधा संपन्न देशासमोरही आव्हान निर्माण झाले आहे,’ असे ट्रम्प यांनी सांगितले. त्याचप्रमाणे अमेरिकेतील सर्व राज्यांना करोनाचा मुकाबला करण्यासाठी आपत्कालीन ऑपरेशन सेंटर तात्काळ सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


हेही वाचा – राज्‍यावर करोनाचे सावट

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -