घरट्रेंडिंगराष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं 'भ्रष्ट' फाउंडेशन बंद!

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ‘भ्रष्ट’ फाउंडेशन बंद!

Subscribe

संस्थेच्या निधीतील बराचसा हिस्सा ट्रम्प कुटुंबिय त्यांच्या राजकीय तसंच औद्योगिक कामांसाठी वापरत असल्याचा आरोप अटॉर्नी जनरल बारबरा अंडरवुडने केला होता.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ‘चॅरिटी फाउंडेशन’ (सेवाभावी संस्था) गेल्या अनेक काळापासून वादात होतं. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या मुलांवर या फाउंडेशनमार्फत भ्रष्टातार केल्याचा आरोप लावण्यात आला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी कुटुंबियांच्या साहाय्याने सुरु केलेल्या या सेवाभावी संस्थेमध्ये त्यांच्याच परिवारातील लोकांनी भ्रष्टाचार केल्याची तक्रारही नोंदवण्यात आली होती. ट्रम्प आणि त्यांच्या मुलांनी संस्थेच्या निधीचा गैरवापर केला असल्याचा आरोप लावण्यात आल्यामुळे न्यूयॉर्कच्या अटॉर्नी जनरल बारबरा अंडरवुडने ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबियांवर खटला दाखल केला होता. संस्थेच्या निधीतील बराचसा हिस्सा ट्रम्प कुटुंबिय त्यांच्या राजकीय तसंच औद्योगिक कामांसाठी वापरत असल्याचा आरोप अटॉर्नी जनरल बारबरा अंडरवुडने केला होता. दरम्यान, आता या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरीनंतर अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचं ‘चॅरिटी फाउंडेशन’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.


वाचा : दहशतवाद्यांना जिंकू देणार नाही- डोनाल्ड ट्रम्प

एका स्थानिक वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प फाउंडेशनला कायदेशीररित्या खंडीत केलं जाईल. तसंच त्यांच्या सगळ्या व्यवहारांवर तात्काळ रोख लावला जाईल. सोबतच आजच्या घडीला ट्रम्प फाउंडेशनमध्ये जमा असलेला सर्वच्या सर्व निधी अन्य चॅरिटी फाउंडेशनमध्ये वाटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतकंच नाही तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्यांच्या तिनही मुलांना, यापुढे न्यूयॉर्कमधीस अन्य कोणत्याच चॅरिटेबल ट्रस्टचा बोर्ड मेंबर (कमिटीचे सदस्य) बनता येणार नाही, असा निर्णय न्यूयॉर्कच्या अटॉर्नी जनरल बारबरा अंडरवुडने दिला आहे. याशिवाय जर ट्रम्प किंवा त्यांच्या मुलांनी अन्य फाउंडेशनच्या कमिटीवर जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर त्वरित रोख लावण्यात येईल, असंही अंडरवुडने स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

मात्र, दुसरीकडे ट्र्म्प फाउंडेशनच्या वकीलांनी अटॉर्नी जनरल बारबरा अंडरवुडवर ते या प्रकरणाचा उगाचच तमाशा करत असल्याचा आरोप केला आहे. ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात सुरु असलेला हा खटला खरतंर कायदेशीर प्रकरण करण्याची गरज नसल्याचंही कंपनीच्या वकिलांनी म्हटलंय. अन्य बऱ्याच प्रकरणांमुळे सध्या ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबियाना  आधीच मनस्ताप सहन करावा लागत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -