लवकरच मॉडर्ना कंपनी अमेरिकेला कोरोना लसीचे १० कोटी डोस देणार – ट्रम्प

Trump says U.S. has reached deal with Moderna for 100 million doses of coronavirus vaccine
लवकरच मॉडर्ना कंपनी अमेरिकेला कोरोना लसीचे १० कोटी डोस देणार - ट्रम्प

संपूर्ण जगात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत. आतापर्यंत अमेरिकत ५३ लाख ५ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी १ लाख ६७ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून २७ लाख ५५ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ‘जगभरातील देशांपेक्षा कोरोना टेस्ट त्यांच्या प्रशासनाने अधिक केल्या आहेत.’ आता लवकरच अमेरिका कोरोना लस (Corona Vaccine) तयार करणारी मॉडर्ना (Moderna) कंपनीशी करार करणार आहे. याबाबत स्वतः राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना माहिती दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ‘अमेरिका कोरोना लस तयार करणाऱ्या मॉडर्ना कंपनीशी करार करणार आहे. या संदर्भात बऱ्याच गोष्टींचा निर्णयही घेण्यात आला आहे. या करारा अंतर्गत मोडर्ना कोरोना लसीचे १० कोटी डोस अमेरिकेला देणार आहे.

पुढे ट्रम्प म्हणाले की, ‘जगातील देशांपेक्षा अमेरिकेत जास्त कोरोना टेस्ट झाल्या आहेत. आतापर्यंत अमेरिकेत ६.६ कोटी लोकांच्या कोरोना टेस्ट झाल्या आहे. तर दीड अब्ज लोकसंख्या असलेल्या भारात २.४ कोटी कोरोना टेस्ट झाल्या आहेत.’

देशात ११ ऑगस्टपर्यंत २ कोटी ६० लाख १५ हजार २९७ कोरोनाच्या चाचण्या झाल्या असून यापैकी मंगळवारी ७ लाख ३३ हजार ४४९ कोरोना चाचण्या झाल्या आहे, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे. तसेच देशात २४ तासांत ६० हजार ९६३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ८४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या २३ लाख २९ हजार ६३९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४६ हजार ९१ रुग्णांचा मृत्यू झाला असून १६ लाख ३९ हजार ६०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ६ लाख ४३ हजार ९४८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


हेही वाचा – अमेरिकाः भारतीय वंशाच्या कमला हॅरिस उपाध्यक्षपदाच्या उमेदवार