घरदेश-विदेशव्हाइट हाऊसमध्येही होणार इफ्तार पार्टी!

व्हाइट हाऊसमध्येही होणार इफ्तार पार्टी!

Subscribe

६ जून रोजी व्हाइट हाऊस येथे होणार इफ्तार पार्टी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रमादानच्या महिन्यात इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. ही पार्टी व्हाइट हाऊस येथे आयोजित करण्यात येईल. ही पार्टी (बुधवार) ६ जून रोजी आयोजित केली आहे. व्हाइट हाऊसचे प्रवक्ते लिंजसे वॉल्टर्स यांनी या माहितीला दुजोरा दिला. मात्र इफ्तार पार्टीला येणाऱ्या पाहुण्यांची यादी अद्याप प्रसारित केली गेली नाही. मुस्लिम विरोधी भूमिका घेऊन निवडणूक जिंकणाऱ्या ट्रम्प यांच्या या निर्णयाने अनेक स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहेत.

ट्रम्प यांची मुस्लिमविरोधी भूमिका

अमेरिकेतील नागरिकांना खूश ठेवण्यासाठी ट्रम्प यांनी निवडणुकीदरम्यान मुस्लिम विरोधी भूमिका घेतली होती. मुस्लिम देशातील नागरिकांच्या प्रवेशावर बंदी आणि स्थलांतरित होणाऱ्या मुस्लिमांना आळा घालण्यासारखे मोठ्या निर्णयांचा यात सहभाग होता. यापूर्वीही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी याच ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. व्हाईट हाऊसमध्ये दिली गेलेली इफ्तार पार्टी हे राजकीय संस्कृतीचे एक प्रतिक मानले जाते. यामध्ये विदेशी दूतावास, सरकारी कर्मचारी आणि अन्य कार्यालयातील मुस्लिम आणि इतर अधिकारी पार्टीत सहभागी होतात.

- Advertisement -
white house iftar dinner obama
माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आयोजित केलेली इफ्तार पार्टी

रमादानचा पवित्र महिना
रमादानचा महिना हा इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात दररोज जगभरातील मुस्लिम बांधव उपवास करतात. आपले मित्र व परिवारासोबत हा उपवास सोडण्यासाठी केलेल्या भोजनाला इफ्तार असे म्हणतात. या पवित्र महिन्यात इश्वराचे नाव घेणे आणि गरिबांना मदत करण्याची शिकवण दिली जाते.

बराक ओबामा यांच्यावेळी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीमध्ये सहभागी झालेल्या जियाद अहमद या मुस्लिम विद्यार्थ्यांने दिलेल्या प्रतिक्रियेत म्हंटले आहे की,” डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिमांवर बंदी आणली. इस्लामविरोधी नागरिकांना ते कामावर ठेवतात. देशाअतंर्गत आणि बाहेरील मुस्लिमांना त्रास देण्यासाठी त्यांच्याकडे विविध योजना आहेत.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -