बगदादमध्ये अमेरिकेच्या दुतावासावर रॉकेट हल्ला, ट्रम्प यांनी इराणला दिला इशारा

डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्यातील तीन रॉकेटचे फोटो ट्विटरवर शेअर केले.

Trump warns Iran after rocket attack on US embassy in Baghdad
बगदादमध्ये अमेरिकेच्या दुतावासावर रॉकेट हल्ला, ट्रम्प यांनी इराणला दिला इशारा

अमेरिका आणि इराणमधील वाद एका भयानक वाटेवर पोहोचला आहे. इराणमधील बगदाद येथे अमेरिकन दूतावासावर रॉकेट हल्ला केला, असा आरोप डोनाल्ड ड्रम्प यांनी इराणवर लावला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः हल्ला करण्यात आलेल्या तीन रॉकेटचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. तसेच हे प्रकरण गंभीर होत असल्याचे ट्रम्प म्हणाले आहेत. शिवाय या हल्लामध्ये जर एकाही अमेरिकन नागरिकाचा मृत्यू झाला तर अमेरिकन सैन्य कारवाई करण्याचा सूचक इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘रविवारी बगदादमध्ये आमच्या दूतावासावर तीन रॉकेटचा हल्ला करण्यात आला. यावेळी हे तीन रॉकेट अपयशी ठरले. हे रॉकेट कुठून आले होते, तर इराणकडून. इराणच्या काही मित्रांना सल्ला आहे, जर एकही अमेरिकेनचा मृत्यू झाला तर यासाठी इराणला जबाबदार धरणार.’

रविवारी इराकी सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, बगदादच्या कडक सुरक्षा असलेल्या ग्रीन झोनमध्ये स्थित अमेरिकेन दूतावासावर कमीत कमी तीन रॉकेटचा निशाणा लावला होता. दूतावासाच्या सी-रॅम रक्षा प्रणालीचा वापर करून रॉकेट हवेमध्ये नष्ट केले गेले. दरम्यान ३ जानेवारीला इराणकडून इराकमध्ये झालेल्या जनरल कासीम सुलेमानीच्या हत्येची आठवण करून देत हा हल्ला केला जाऊ शकतो अशी व्हाईट हाऊसला भीती आहे. जनरल सुलेमानी अमेरिकाने केलेल्या हवाई हल्ल्यात ठार झाला होता.


हेही वाचा – कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे हे आहे नाव, कोरोनाची दुसऱ्यांदाही होऊ शकते लागण