घरदेश-विदेशडोनाल्ड ट्रम्पच्या 'इफ्तार'ला मुस्लिम बांधवांच्या वाटाण्याच्या अक्षता!

डोनाल्ड ट्रम्पच्या ‘इफ्तार’ला मुस्लिम बांधवांच्या वाटाण्याच्या अक्षता!

Subscribe

सध्या देशभरात रमजानचे दिवस सुरु आहेत. संध्याकाळी अजानची वेळ झाल्यानंतर रोजा सोडण्यासाठी सगळे मुस्लिम बांधव एकवटतात आणि चमचमीत मेजवानीवर ताव मारतात. पण आता थेट अमेरिकेतल्या व्हाईट हाऊसमध्ये देखील अशाच प्रकारे इफ्तारची पार्टी रंगणार आहे. मात्र, ज्या मुस्लिम बांधवांसाठी ही इफ्तार पार्टी ट्रम्प देणार आहेत, त्यांनीच या इफ्तार पार्टीला न जाण्याचा एकत्रित निर्णय घेतला आहे.

मुस्लिम विरोधी धोरणाचा परिणाम

राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या वेळीच ट्रम्प यांची मुस्लिम विरोधी भूमिका दिसली होती. ‘दहशतवादाची पाळंमुळं उकरुन टाकायची असतील तर देशात मुस्लिमांना प्रवेश बंदी केली पाहिजे, शिवाय अमेरिकेत फिरायला येणाऱ्या मुस्लिम पर्यटकांवरही बंदी घातली पाहिजे’, असं ट्रम्प म्हणाले होते. राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर मुस्लिमविरोधी धोरणाचा विजय झाला असेच सूर उमटले होते. आणि आता भूमिकेच्या अगदी उलट वागत ट्रम्प यांनी मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं. त्यामुळे अमेरिकेतील मुस्लिम बांधवांच्या भुवया उंचावल्या आहेत. भूमिकेशी परस्पर विरोधी वागणाऱ्या ट्रम्प यांच्या या पार्टीकडे म्हणूनच अमेरिकेतल्या अनेक मुस्लिम बांधवांनी पाठ फिरवली आहे.

- Advertisement -
व्हाईट हाऊसच्या बाहेर करणार इफ्तार पार्टी

ट्रम्प यांच्या इफ्तार पार्टीला विरोधी करत अमेरिकेतल्या मुस्लिम बांधवांनी व्हाईट हाऊसच्या बाहेरच इफ्तार पार्टी करायचं ठरवलं आहे. ट्रम्प यांच्या पार्टीला नकार देत व्हाईट हाऊसच्या बाहेरच ही पार्टी करण्याचा निर्णय अमेरिकेतील मुस्लिम संघटनांनी घेतला आहे.

व्हाईट हाऊसमधील ‘इफ्तार’ची परंपरा

१८०५ साली पहिल्यांदा व्हाईट हाऊसमध्ये इफ्तार पार्टी करण्यात आली होती. त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांनी ही पहिली पार्टी आयोजित केली.

- Advertisement -
thomas-jefferson-9353715-1-402
थॉमस जेफरसन, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका (१८०१-०४)

त्यानंतर १९९६ साली बिल क्लिंटन यांनी ही प्रथा सुरु केली.

बराक ओबामा हे राष्ट्राध्यक्ष असतानाही ते ईदनिमित्त विशेष संदेश जारी करायचे. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी ही इफ्तार पार्टी व्हाईट हाऊसमध्ये ठेवली आहे.

 

 

Bill Clinton
बिल क्लिंटन, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका( १९९३-२०००)

 

 

 

IFTAR IN WHITE HOUSE _BARAK_OBAMA
ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिलेल्या इफ्तार पार्टीतील क्षण
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -