Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश पाकिस्तानातही वाजू शकते आता निवडणुकांचे बिगूल; निवडणूक आयोगाने दिले संकेत

पाकिस्तानातही वाजू शकते आता निवडणुकांचे बिगूल; निवडणूक आयोगाने दिले संकेत

Subscribe

पाकिस्तानमधील शहबाज शरीफ यांचे सरकार वेळेआधीच भंग झाल्याने तेथे सध्या काळजीवाहू सरकार स्थापन असून ते पाकिस्तानचा कारभार चालवत आहे.

नवी दिल्ली : भारतात ज्याप्रमाणे आगामी 2024 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. अगदीच त्याचप्रकारे आपल्या शेजारी असलेल्या पाकिस्तानमध्येही पुढील काही महिन्यांत सार्वत्रिक निवडणुकांचे बिगू वाजणार असल्याची शक्यता आहे. कारण, तसे संकेत तेथील केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत.(Trumpet of elections can be sounded in Pakistan too; The instructions given by the Election Commission)

पाकिस्तानमधील शहबाज शरीफ यांचे सरकार वेळेआधीच भंग झाल्याने तेथे सध्या काळजीवाहू सरकार स्थापन असून ते पाकिस्तानचा कारभार चालवत आहे. दरम्यान सरकार भंग झाल्यापासून 90 दिवसांच्या आत निवडणुका घेणे अनिवार्य असते. त्यानुसार आता पाकिस्तानमध्ये विविध राजकीय पक्ष सरकारला आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे निवडणुका घेण्याबाबत दबाव आणत आहे. या दबावानंतर आता तेथील केंद्रीय निवडणूक आयोगाने या राजकीय पक्षांना लवकरच निवडणुका घेऊ असे आश्वासन दिले आहे.

अवामी नॅशनल पार्टीच्या भेटीनंतर मिळाले आश्वासन

- Advertisement -

पाकिस्तानमध्ये सध्या राजकीय उलथापालथी सुरू आहेत. शहबाज शरीफ यांच्या भंग झालेल्या सरकारनंतर तेथे काळजीवाहू सरकार आहे. याच दरम्यान 90 दिवसांच्या आत निवडणुका घेणे क्रमप्राप्त असताना पाकिस्तानमधील अवामी नॅशनल पार्टी पक्षाच्या नेत्यांनी पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने फेब्रुवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे आश्वासन दिले. यांसदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष सिकंदर सुलतान राजा यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीनंतर हे आश्वासन देण्यात आले आहे.

हेही वाचा : संसदेचे विशेष अधिवेशन पुढील महिन्यात; लोकसभा निवडणुकांच्या नांदीची चर्चा

निवडणूक आयोगाने सांगितले उशिरामागील कारण

- Advertisement -

पाकिस्तानमधील एएनपी पक्ष आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांच्यात झालेल्या बैठकीत निवडणूक आयोगाने सांगितले की, निवडणुकाआधी नव्याने जनगणना आणि नव्याने मतदार संघाची रचना करण्याच्या प्रक्रियेत आमचा वेळ गेला असल्याचे सांगितले. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकांची तारीख ठरविण्यात विलंब लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान एएनपीने निवडणूक आयोगाकडे मागणी केली, जर 90 दिवसांच्या आत निवडणुका घेणे शक्य नसेल तर निवडणुकीची तारीख आणि वेळापत्रक जाहीर करावे, जेणेकरून आम्हाला त्यानुसार तयारी करता येईल, एएनपीच्या आधी पाकिस्तान पीपल्स पार्टीने (पीपीपी) सुद्धा एका दिवस आधी अशीच मागणी केली होती.

हेही वाचा : Jamtara : जगाला फसवणाऱ्या टोळीनं सुप्रीम कोर्टालाही सोडलं नाही; नेमकं प्रकरण काय?

2024 च्या जानेवारी-फेब्रुवारी होऊ शकतात निवडणुका

या बैठकीदरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितले की, निवडणुका घेण्याच्या मागणीवरून कोणत्याही पक्षाने कितीही दबाव टाकला तरी आमची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय आम्ही निवडणूक घेणार नाही. तर कोणत्याही पक्षाच्या दबावाखाली झुकणार नाही. मात्र, असे जरी असले तरी पुढील वर्षी जानेवारी फेब्रुवारी महिन्यांत निवडणूक घेणार असल्याचेही जोर देत सांगण्यात आले.

- Advertisment -