घरताज्या घडामोडीकोरोनावर मात करण्यासाठी ट्रम्प यांना दिलं भारतात तयार केलेलं 'हे' स्वस्त औषधं

कोरोनावर मात करण्यासाठी ट्रम्प यांना दिलं भारतात तयार केलेलं ‘हे’ स्वस्त औषधं

Subscribe

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान सुरुवातील त्यांना कोरोनावर प्रभावी असणारी Remdesivir आणि REGN-COV2 औषधं दिली होती. पण आता डॉक्टरांनी त्यांना डेक्सामेथासोन औषधं दिलं असल्याची माहिती समोर येत आहे.

डेक्सामेथासोन औषधं हे खूप स्वस्त असून याला कोरोनापासून जीव वाचवणार औषधं असं म्हटलं जात. डेक्सामेथासोन औषध कोरोना रुग्णांचे काही टक्के जीव वाचवण्यास यशस्वी ठरते, असे ब्रिटेनमधील झालेल्या ट्रायलमध्ये समोर आले आहे. भारतात डेक्सामेथासोन औषधं मोठ्या प्रमाणात तयार केलं जातं. भारत जगातील सर्वात मोठा डेक्सामेथासोन निर्यात करणार देश आहे. अमेरिका दरवर्षी भारताकडून ३६ कोटी रुपयाचे डेक्सामेथासोन औषधं खरेदी करते. त्यामुळे सध्या ट्रम्प भारतात तयार केलेले डेक्सामेथासोन औषधं घेत असल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

डेक्सामेथासोन एक स्टेरॉयड आहे. इतर आजारासाठी पहिल्यांदा डॉक्टर या औषधाचा वापर करत आहेत. हेच औषध डोनाल्ड ट्रम्प यांना वॉल्टर रीड नॅशनल मिलिट्री मेडिकल सेंटरच्या डॉक्टरांनी दिलं आहे.

दरम्यान ट्रायलमध्ये असे समोर आले होती की, ‘डेक्सामेथासोन औषधामुळे ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण २० ते २४ टक्क्यापर्यंत कमी होते. जेव्हा व्हेटिंलेटवरील रुग्णांना हे औषधं दिलं गेलं तेव्हा त्यांच्या मृत्यूचे प्रमाणे २८ ते ४० ट्क्यांनी कमी झाल्याचे समोर आलं.’

- Advertisement -

डेक्सामेथसोनचा वापर दमा, जळजळ, एलर्जी, सेप्सिसयासह इतर आजारांसाठी देखील केला जातो. डेक्सामेथासोन हे औषधं गोळ्या आणि इंजेक्शन अशा दोन्ही स्वरुपात उपलब्ध आहे. कोरोनाच्या काळात जो रुग्णालयात दाखल आहे, त्याच रुग्णांवर या औषधाचा परिणाम दिसून येता. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना या औषधाचा फायदा नाही.


हेही वाचा – Gold Silver Price: सोने-चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे दर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -