केंद्राच्या पेट्रोल-डिझेलवरील कर कपातीची पी. चिदंबरम यांनी केली पोलखोल

truth behind the central government's petrol-diesel tax cuts p. Chidambaram will say
truth behind the central government's petrol-diesel tax cuts p. Chidambaram will say

केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात मोठी कपात केली आहे. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क लिटरमागे 8 रुपयांनी, तर डिझेलवरील उत्पादन शुल्क 6 रुपयांनी कमी करण्यात आले आहे. त्यामुळे पेट्रोल साडेनऊ रुपयांनी, तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त होणार आहे. यानंतर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ट्विट करत या निर्णयाची पोलखोल केली आहे.

दोन महिन्यांत १० रुपये प्रति लिटर वाढवा आणि पेट्रोलवर ९.५० रुपये प्रति लिटर आणि डिझेलवर ७ रुपये प्रति लिटर कपात करा. हे आधी लुटणे आणि नंतर कमी पैसे देण्यासारखे आहे! अर्थमंत्र्यांनी राज्यांना केलेले आवाहन व्यर्थ आहे. जेव्हा त्यांनी केंद्रीय उत्पादन शुल्कात १ रुपयांची कपात केली तेव्हा त्या रुपयातील ४१ पैसे राज्यांच्या मालकीचे असतात. याचा अर्थ केंद्राने ५९ पैसे आणि राज्यांनी ४१ पैशांची कपात केली आहे. त्यामुळे बोटे दाखवू नका. जेव्हा केंद्र पेट्रोल आणि डिझेलवरील उपकर कमी करेल तेव्हा खरी कपात होईल असा टोलाही त्यांनी लागावला.

१ लाख कोटी रूपयांपैकी प्रत्यक्षात केंद्राचे ५१ हजार कोटींचा तोटा होणार आहे. तर राज्यांना त्या हिश्शापोटी मिळणाऱ्या ४१ हजार कोटी रूपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे, असे पी चिदमबरम यांनी सांगितले आहे. त्यातच आता महाराष्ट्र सरकारनेही पेट्रोलच्या दरात २ रूपये ८ पैशांची तर डिझेलवरील करात १ रूपये ४४ पैशांची कपात केली आहे.