घरताज्या घडामोडीतुर्कस्तानमध्ये कोळसा खाणीत स्फोट; 22 जणांचा मृत्यू, 50 अजूनही अडकले

तुर्कस्तानमध्ये कोळसा खाणीत स्फोट; 22 जणांचा मृत्यू, 50 अजूनही अडकले

Subscribe

तुर्कीमधील कोळशाच्या खाणीत झालेल्या भीषण स्फोटात 22 जणांचा मृत्यू झाला. तुर्कस्तानमध्ये शुक्रवारी संध्याकाळी उशिरा हा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटानंतर अजूनही डझनभर खाण कामगार अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहेत.

तुर्कीमधील कोळशाच्या खाणीत झालेल्या भीषण स्फोटात 22 जणांचा मृत्यू झाला. तुर्कस्तानमध्ये शुक्रवारी संध्याकाळी उशिरा हा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटानंतर अजूनही डझनभर खाण कामगार अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहेत. ही घटना तुर्कस्तानच्या काळ्या समुद्र किनारी घडली. सद्यस्थितीत खाणीत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी शर्तीच्या प्रयत्नांनी बचाव कार्य करत आहेत. (turkey mine blast 22 killed several trapped in turkey)

कोळशाच्या खाणीत निर्माण झालेल्या मिथेन वायूमुळे हा स्फोट झाल्याचे बोलले जात आहे. तुर्कीचे आरोग्य मंत्री फहरेटिन कोका यांनी या अपघाताचे वर्णन तुर्कीतील सर्वात प्राणघातक औद्योगिक अपघातांपैकी एक म्हणून केले आणि सांगितले की, खाणीतून जिवंत बाहेर काढल्यानंतर 8 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच, गृहमंत्री सुलेमान सोयलू यांनी सांगितले की, या खाणीत एकूण 110 लोक काम करत होते. त्यापैकी काही स्वत: बाहेर आले, काही वाचले तर काही जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 50 खाण कामगार जमिनीखाली 300 ते 350 मीटर (985 ते 1,150 फूट) दरम्यान दोन वेगवेगळ्या भागात अडकले आहेत. बार्टिन प्रांतातील आमसारा शहरातील खाणीत हा स्फोट झाला. स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तुर्कस्तानची आपत्ती व्यवस्थापन एजन्सी एएफएडीने सांगितले की, अनेक बचाव पथके घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत.

दरम्यान, तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी सांगितले की, ते आजचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात येणार आहेत. तसेच, शनिवारी अपघातस्थळी जाणार असून, खाण कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात येईल, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अंधारामुळे बचाव कार्यात अडचणींचा सामना करावा लागला.

- Advertisement -

हेही वाचा – हरियाणाच्या गुरुग्राममधील ऑटो पार्ट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला भीषण आग

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -