तुर्कस्तान आणि सीरिया या देशांची भूकंपामुळे वाताहत झाली आहे. तुर्कस्तानमममध्ये सोमवारी एकापाठोपाठ एक असा तीन भूकंपाच्या धक्क्याने देश हादरला आहे. भूकंपामुळे एकट्या तुर्कीस्तानमध्ये आत्तापर्यंत 2000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सीरियात मृतांची संख्या 1500 च्या पुढे गेली आहे. यासह तुर्कीमध्ये 110000 हून अधिक लोकं जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. तुर्कीत सोमवारी सायंकाळी तिसरा भूकंप झाला त्याची तीव्रता ६.० रिश्टर स्केल इतकी होती. (turkey syria earthquake live update killing more than 3400 people killing buildings destroyed)
तुर्कीत झालेल्या शक्तीशाली भूकंपाच 2818 हून अधिक इमारती उद्धवस्त झाल्या आहेत. शाळा, कॉलेज, रुग्णालये आणि रहिवासी इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या. तुर्कीत डोळ्याची पापणी लवताच होत्याचं नव्हत होऊन बसलं आहे. आत्तापर्यंत 2470 हून अधिक लोकांना ढिगाऱ्यातून काढण्यात आलं आहे. मात्र हजारो लोकं ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. यामुळे तुर्कीत मोठ्याप्रमाात बचाव आणि मदत कार्य सुरु आहे. या भूंकपाचा रहिवासी इमारतींसह अनेक सरकारी यंत्रणा आणि रेस्क्यू ऑपेरशनच्या इमारतींनाही धक्का बसला आहे. यामुळे मदत करणाऱ्या यंत्राणाही यात फसल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकापर्यंत मदत पोहचण्यात यंत्रणा कमी पडत आहेत. यामुळे तुर्कीमध्ये भूकंपामुळे प्रचंड विध्वंस झाला आहे.
यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, 7.8 रिश्टर स्केलच्या पहिल्या भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कस्तानच्या कहरामनमारस प्रांतातील गझियानटेप शहरापासून 30 किमी अंतरावर आणि जमिनीपासून सुमारे 24 किमी खाली होता. स्थानिक वेळेनुसार पहाटे 4.17 वाजता हा भूकंप झाला. यानंतर 11 मिनिटांनी 6.7 तीव्रतेचा दुसरा भूकंपाचा धक्का बसला, ज्याचा केंद्रबिंदू जमिनीपासून 9.9 किमी खाली होता. यानंतर दुपारी 1.24 वाजता 7.5 रिश्टर स्केलचा तिसरा भूकंप झाला.
तुर्कीस्तानला पोहचल्या भारताच्या 2 एनडीआरएफ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी सुचनेनुसार त्यांचे सचिव पीके मिश्रा यांनी तुर्कीस्तानला तातडीने मदत देण्यासाठी एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत तुर्कस्तानमध्ये शोध आणि बचावा कार्यासाठी एनडीआरएफ आणि वैद्यकीय पथक पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार या दोन्ही टीम आता तुर्कीस्तानला पोहचल्या आहेत. यासोबतच तुर्कस्तानमध्ये आवश्यकती मदत सामग्री लवकराच लवकर पाठवण्यात येणार आहे. एनडीआरएफच्या दोन तुकड्यांमध्ये 100 जवान आहेत, यामध्ये श्वानपथकांचाही समावेश आहे. यासह ही पथकं आवश्यकती उपकरणं सोबत घेऊन गेले आहे. वैद्यकीय पथकात डॉक्टर, इतर कर्मचारी आणि अत्यावश्यक औषधं मशीन आहेत.
#TurkeyEarthquake | Last night, an Indian Air Force C-17 left for Turkey with search & rescue teams of the National Disaster Response Force (NDRF). This aircraft is part of a larger relief effort that will be undertaken by the IAF along with other Indian organisations: IAF pic.twitter.com/bLbn5SbHcP
— ANI (@ANI) February 7, 2023
#TurkeyEarthquake | The first batch of earthquake relief material left for Turkey, along with NDRF Search & Rescue Teams, specially trained dog squads, medical supplies, drilling machines and other necessary equipment: Ministry of External Affairs (MEA)
(Pics: MEA Spokesperson) pic.twitter.com/4kc5QbeSec
— ANI (@ANI) February 7, 2023
यात तुर्कीस्तानसह सीरियात सर्वाधिक विध्वंस होताना दिसत आहे. यात सीरियासह अनेक मोठमोठ्या इमारती जमीनदोस्त झाल्या. ढिगाऱ्याखाली दबलेले लोकं जीव वाचवण्यासाठी याचना करत आहेत. मात्र सीरियात वारंवार भूकंपाचे धक्के बसत असल्याने मदत आणि बचाव कार्यात अनेक अडचणी येत आहेत.

सीरियामध्ये स्थानिक वेळेनुसार सोमवारी पहाटे 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत 50 हून अधिक भूकंप झाले. यातील चौघांची तीव्रता 6.00 हून अधिक होती. तर 5 ते 6 या तीव्रतेच्या 10 भूकंपांची नोंद झाली. तर एकूण चार देशांमध्ये सोमवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जगभरात 78 भूकंपांची नोंद झाली. त्यापैकी 46 भूकंप एकट्या सीरियामध्ये आले.
त्यामुळे सीरियातील दमास्कस, अलेप्पो, हामा, लताकियासह अनेक शहरांमध्ये इमारतीच्या इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. या भूकंपामुळे रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या प्रदेशातील सर्वात वाईट परिस्थिती निर्वासित नागरिकांच्या शिबिरांमध्ये दिसून आली, कारण याठिकाणी देशभरातील दहशतवादाचे आधीच बळी ठरलेले आता या नैसर्गिक धोक्यांमुळे ग्रस्त आहेत.
तुर्कीच्या आपत्ती व्यवस्थापन एजन्सी एएफएडीने लेव्हल-४ अलर्ट जारी केला असून आंतरराष्ट्रीय समुदायाला मदत सामग्री आणि बचाव कर्मचारी पाठवण्याचे आवाहन केले आहे.
सीरिया आधीच दीर्घकाळ गृहयुद्धाच्या खाईत आहे. थंडी, पाऊस आणि बर्फवृष्टी यामुळे नागरिक आधीच अनेक संकटांचा सामना करत आहेत, यात भूकंपानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. देशाच्या इतर भागांतून विस्थापित झालेले सुमारे 40 लाख लोक येथील अनेक केंद्रांमध्ये अत्यंत दयनीय अवस्थेत जगत आहेत. व्हाईट हेल्मेट विरोधी आपत्कालीन संघटनेने सांगितले की, शेकडो कुटुंबे ढिगाऱ्याखाली अडकली आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या मते, सीरियातील लाखो लोक संघर्षामुळे असुरक्षित आहेत. प्रदेशात 2.9 दशलक्ष लोक विस्थापित झाले आहेत आणि 1.8 दशलक्ष छावण्यांमध्ये राहत आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे बचावकार्त्यात अनेक अडचणी येत आहेत. थंडी, मुसळधार पाऊस आणि यात भूकंपामुळे अनेक कुटुंब रस्त्यावर आली आहेत.