घरदेश-विदेशभूकंपानंतर तुर्की, सीरियात सर्वत्र हाहाकार; 500 हून अधिक नागरिकांचा मृत्यू

भूकंपानंतर तुर्की, सीरियात सर्वत्र हाहाकार; 500 हून अधिक नागरिकांचा मृत्यू

Subscribe

तुर्की 7.8 तीव्रतेच्या भूकंपामुळे हादरला आहे. सोमवारी पहाटे झालेल्या भूकंपाचे तीव्र धक्के तुर्की, सीरियासह अनेक देशांना जाणवले. यात अनेक इमारती, घरं पत्त्यांच्या पानासारख्या कोसळल्या. यामुळे झोपतचं अनेक नागरिकांचा जीव गेला आहे. तुर्की, सीरियासह चार देशांमध्ये या भूकंपाची तीव्रता जाणवली, ज्यामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. आत्तापर्यंत या भूकंपात 550 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 900 हून अधिक जखमी नागरिकांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. अद्यापही अनेक इमारतींच्या ढिगाऱ्याखालून नागरिकांना बाहेर काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सायप्रस आणि मिस्त्रपर्यंत या देशांपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले त्यावरून तुम्ही हा भूकंप किती भयानक असेल याची केवळ कल्पना करु शकता.

- Advertisement -

तुर्कीत जाणवलेल्या भूकंपाचे झटके केवळ एक नव्हे तर चार देशात म्हणजे इस्रायल, पॅलेस्टाईन, सायप्रस, लेबनान आणि इराकमध्येही जाणवले आहेत. यात तुर्की, सीरियातील जवळपास 700 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तुर्कीत सौदी अरेबियामधील 7 नागरिकांचा मृत्यू झाव आहे. या भूकंपामुळे कमीत कमी 150 इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. या भूकंपाचे व्हिडीओ व्हायरल झाले असून त्यातून भूकंपाची तीव्रता दिसून येते. यामुळे कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यातून लोकांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.

- Advertisement -

सीरिया राष्ट्रीय भूकंप केंद्राचे प्रमुख रायद अहमद सरकारने म्हटले की, हा भूकंप देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा भूकंपापैकी एक आहे. या भूकंपामुळे एकट्या सीरियात 100 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या अंदाजानुसार, तुर्की आणि सीरियातील भूकंपामुळे जवळपास 1 हजार लोक दगावल्याची शक्यता आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, तुर्कीमधील गाझियांटेप शहराजवळील नूर्दगी शहरापासून 26 किलोमीटर अंतरावर या भूकंपाचं केंद्र आहे. युनायटेड जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूपृष्ठापासून जवळपास 14.1 किलोमीटर खाली या भूकंपाचं केंद्र आहे. या तीव्र भूकंपाच्या धक्क्याने सीरियात मोठं नुकसान झालं आहे. यात अलेप्पो आणि हमा शहरात अनेक इमारती कोसळल्या, तर तुर्कीच्या मालात्या प्रांतात 23 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 130 इमारती कोसळल्या आहेत. यासह सनलीउर्फामध्ये 17, दियारबकिर 6 आणि उस्मानियेमध्ये 5 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बचाव पथकांकडून युद्धपातळीवर सर्च आणि रेक्स्यू ऑपरेशन सुरु आहे.

तुर्कीच्या या भीषण नैसर्गिक आपत्तीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. यात मोदींनी तुर्कीला शक्य ती सर्व मदत केली जाईल असा शब्द दिला आहे. मोदींनी ट्विट करत म्हटले की, तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपातील जीवितहानी आणि वित्तहानीमुळे दु:ख झालं आहे. आपल्या नातेवाईकांना यात गमावलेल्या व्यक्तींच्या दु:खात आम्ही सहभागी आहे. जखमी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना. या नैसर्गिक आपत्तीमध्ये भारत तुर्कीच्या नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे. शक्य ती सर्व मदत देण्यासाठी आम्ही तयार आहोत, अस ट्विट मोदींनी केलं आहे.


कसबा पोटनिवडणूक बिनविरोधात! वेळ आहे, उमेदवार बदलता येईल, बावनकुळेंचं सूचक विधान

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -