Wednesday, March 3, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश पाक तुर्कस्थानच्या मदतीने काश्मीरमध्ये हल्ल्या घडविण्याच्या तयारीत

पाक तुर्कस्थानच्या मदतीने काश्मीरमध्ये हल्ल्या घडविण्याच्या तयारीत

Related Story

- Advertisement -

भारताकडून काश्मीरमध्ये होणाऱ्या पाकच्या खुपया कुरघोंडीना चोख प्रत्युत्तर दिले जाते. भारतीय जवानांच्या दहशवादीविरोधी ऑपरेशनमध्ये आत्तापर्यंत अनेक पाक दहशतवाद्यांचा खात्म करत कंठस्नान घातले. त्यामुळे जळफळाट झालेला पाक आता तुर्कस्थानच्या मदतीने काश्मीरमध्ये दहशवादी हल्ला घडवण्यच्या तयारीत आहे. तुर्कीस्थान भाडोत्री सैनिकांच्या माध्यमातून काश्मीरमध्ये कारवाई सुरु करणार आहे. तुर्कीस्थान पाकिस्तानचा मित्रराष्ट्र आहे. त्यामुळे डरपोक पाक आता तुर्कीस्थानला हाताशी घेऊन काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा मोठे कटकारस्थान रचत आहे. ग्रीसमधील एका माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या वृत्तामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. या वृत्तामध्ये तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचप तय्यप एर्दोगन भारताविरोधा कारवाया करण्यासाठी भाडोत्री सैनिकांना काश्मीरमध्ये पाठवणार असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. यासाठी तुर्कीच्या सैन्य सल्लागाराने काश्मीरविरोधा कारवाईसाठी अमेरिकेत सक्रिय दहशतवादी संघटनेचीही यासाठी मदत घेतली आहे.

पेंटापोस्टगामाच्या अहवालाने म्हटले आहे की, तुर्कीची भाडोत्री सैनिक संघटना असलेली सादात आता काश्मीरमध्ये सक्रिय होत आहे. सादात ही संघटना भाडोत्री दहशतवाद्यांच्या जोरावर दहशतवादी कारवाया करते. जी तुर्की, सीरिया, लिबियासह अनेक देशांमध्ये जिहादींना प्रशिक्षण देणे आणि शस्त्रास्त्रे उपलब्ध करुन देते. यामध्ये मोठ्या संख्येने तुर्की लष्करातील निवृत्त सैनिकांचा समावेश आहे. यातून तुर्कीला स्वत; मध्य आशियामध्ये सर्वात ताकदवान दहशवादी संघटना असल्याचे दाखवून द्यायचे आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचप तय्यप एर्दोगन यांनी मिशन काश्मीरची जबाबदारी सादात संघटनेकडे दिली आहे. सादात या संघटनेचे नेतृत्त्व एर्दोगन यांचे सैन्य सल्लागार अदनान तनरिवर्दीकडे आहे. तसेच काश्मीरमध्ये जन्मलेला सय्यद गुलाम नबी फई या दहशतवाद्याला नियुक्त केले आहे. फईने याआधी पाकिस्तानी गुप्तचर यंत्राणा आयएसआयच्या पैशाच्या जोरावर भारताविरोधी कारवाया करण्यासाठी भाडोत्री सैनिकांची भरती केल्याप्रकरणी अमेरिकेत दोन वर्षांची शिक्षा भोगली आहे. या अहवालात म्हटले आहे की, फई या दहशतवाद्याने काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी अमेरिकेतील अमेरिकन कौन्सिल ऑफ काश्मीर’ची (केएसी) ही संस्था तयार केली. या संघटनेला पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयल आर्थिक मदत पुरवत होती. याच संस्थेच्या मदतीने आता तुर्कीची सादात आणि इस्लामिक दुनिया ही संस्था काश्मीरविरोधात कटकारस्थान रचत आहे. काश्मीरविरोधी कारवाई करण्यात सय्यद गुलाम नबी फई प सक्रिय आहे. तो अनेकवेळा सादातच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसला आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisement -

 

- Advertisement -