घरदेश-विदेशतुर्कस्तान, सीरियात भूकंपामुळे हाहाकार; मृतांचा आकडा 24 हजारांवर

तुर्कस्तान, सीरियात भूकंपामुळे हाहाकार; मृतांचा आकडा 24 हजारांवर

Subscribe

तुर्कस्तान आणि सीरियात झालेल्या विनाशारी भूकंपातील मृतांचा आकडा आता 24 हजारांच्या पार गेला आहे. तर जखमींचा आकडाही हजारोंच्या घरात पोहचला आहे. दरम्यान भूकंपानंतरही संकटकांचा डोंगर काही कमी होत नाही, एकीकडे पोटभर अन्नाची भ्रांत तर दुसरीकडे जीवघेण्या थंडीमुळे अनेक अडचणींना सामना करावा लागतो. यात मृतांचा संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भूकंपानंतर दिवसामागू दिवस उजाडतायत तशी ढिगाऱ्याखालून जिवंत व्यक्ती सापडण्याची आशा मावळत आहेत. तरी देखील रेस्क्यू टीमकडून नागरिकांना जिवंत बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. एकट्या तुर्कस्तानमध्ये किमान 20,213 नागरिकांचा मृत्यू झाला तर 80,052 नागरिक जखमी झाले आहेत. तुर्कीच्या आरोग्य मंत्र्यांच्या माहितीनुसार, कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढलेल्या नागरिकांन आता भूकंपग्रस्त भागातून बाहेरच्या प्रांतात हलवलं जात आहे.

- Advertisement -

तुर्कस्तानशिवाय सीरियातही भूकंपबळींची संख्या 3,300 हून अधिक झाली आहे. जगभरातील देशांतील मदत आणि बचाव पथकं भूकंपबाधित भागात पोहचतं आहेत. यात भारताने मदतीसाठी ऑपरेशन दोस्त नावाने एक मोहिम सुरु केली आहे. यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत म्हटले की, भूकंपग्रस्त तुर्कस्तानमध्ये मदत आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी ऑपरेशन दोस्त अंतर्गत भारतीय पथके रात्रंदिवस काम करत आहेत. जास्तीत जास्त जीव आणि मालमत्ता वाचवण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत राहतील. या कठीण काळात भारत तुर्कस्तानच्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

- Advertisement -

दरम्यान भूकंपाला 100 हून अधिक तास उलटून गेल्या आता ढिगाऱ्याखाली अडलेले बहुतांश नागरिक जिवंत सापडण्याची आशा संपत आहे, असे असतानाही सर्च ऑपरेशनमधील पथकं रात्रंदिवस काम करत आहेत. एक-एका नागरिकाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तुर्कस्तान-सिरियातील एक कोटी 35 लाखांहून अधिक नागरिकांना या भूकंपाचा फटका बसला आहे.


महाराष्ट्रात हे काय सुरू आहे? पत्रकार वारीसेंच्या मृत्यू प्रकरणी राऊतांचा फडणवीसांना सवाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -