घरताज्या घडामोडीचीनमध्ये बस उलटून 27 जणांचा जागीच मृत्यू

चीनमध्ये बस उलटून 27 जणांचा जागीच मृत्यू

Subscribe

बस उलटून 27 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चीनमध्ये हे अपघात झाला असून, 20 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

बस उलटून 27 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चीनमध्ये हे अपघात झाला असून, 20 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. चीनच्या दक्षिण-पश्चिम भागातील एका एक्स्पेस महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. (Twenty seven people were killed in a bus crash in southwest China )

मिळालेल्या माहितीनुसार, चीनमध्ये रविवारी हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक पोलीस आणि बचाव यंत्रणांनी धाव घेत शर्तीच्या प्रयत्नांनी बचावकार्य सुरू केले. ‘ग्रामीण गुइझोउ प्रांतातील एका महामार्गावर हा अपघात झाला असून, या बसमधून 47 लोक प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात दिली आहे.

- Advertisement -

या अपघाताबाबत पुढील कारवाई केली जात असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकांची मदत घेण्यात येत आहे. या अपघातामुळे एक्स्प्रेस महामार्गावरील वाहतूक खोळंबल्याची माहिती मिळत आहे.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 27 जणांचा एकाच वेळी बस अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे घडला, याचाही तपास आता केला जात आहे. 2022 या वर्षात चीनमध्ये झालेला आत्तापर्यंतचा हा सगळ्यात मोठा अपघात असल्याचे समजते.

- Advertisement -

जूनमध्ये चीनमधील गुईझोउ प्रांतात हाय-स्पीड ट्रेन रुळावरून घसरल्याने चालकाचा मृत्यू झाला होता. तसेच, मार्चमध्ये एका चिनी प्रवासी जेट अपघातात विमानातील सर्व 132 लोकांचा मृत्यू झाला. तसेच, हा अपघात चीनमध्ये अनेक दशकांतील सर्वात प्राणघातक विमान अपघात होता.


हेही वाचा – राहुल गांधींना पक्षाध्यक्ष करण्याचा ठराव महाराष्ट्र काँग्रेसकडून मंजूर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -