घरट्रेंडिंगजुळ्या बहिणींचे, जुळ्या भावांशी लग्न, आता एकत्र होणार आई!

जुळ्या बहिणींचे, जुळ्या भावांशी लग्न, आता एकत्र होणार आई!

Subscribe

जुळ्या भावा-बहिणींच्या गोष्टी बऱ्याचदा ऐकल्या असतील आणि पाहिल्या असतील. दहावी बारावीचे निकाल लागल्यानंतर बऱ्याच जुळ्यांना सारखे गुण मिळाल्याचे पाहायला मिळाले. पण आजची जुळ्यांची कहाणी ही अनोखी असून ती आश्चर्यचकीत करणारी आहे. जुळ्या बहिणींनी जुळ्या भावांशी लग्न केले आणि आता दोघीही एकाच वेळी गर्भवती आहेत.

जुळ्या बहिणी ब्रिटनी आणि ब्रायन डीम सॅलियर्स यांनी जुळे भाऊ जोश आणि जेरेमी सॅलियर्सशी लग्न केले. आता दोघींही एकत्र आई होणार आहेत. इन्स्टाग्रामवर ब्रिटनी आणि ब्रेना यांनी एकत्र गर्भवती राहिल्याबद्दल सांगितले. त्यामुळे आश्चर्यचकीत करणाऱ्या या गोष्टींमुळे सध्या या जुळ्या जोडप्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

Guess what!!?? BOTH couples are pregnant! 🤰🤰 We are thrilled and grateful to experience overlapping pregnancies and to share this news with you all! ✨🍀✨🍀✨🍀✨🍀✨ Our children will not only be cousins, but full genetic siblings and quaternary multiples! Can't wait to meet them and for them to meet each other! ✨🍀✨🍀✨🍀✨🍀✨ #SalyersTwins #TwinsMarriedToTwins #expecting #thebump #pregnancyannouncement #pregnancyandbeyond #twinning #dubblebubble #baywatch #babywatch #pregnancyphoto #pregnant #bestpregnancyphotos #maternity #momstobe #dadstobe #twinsisters #twinbrothers #strangethings #identicaltwins #deanetwins #twincouples #twinmoms #twindads #miracle #ourtwinsanewedding #twinwedding #twinpregnancy #pregnancyphotoshoot #dreamcometrue

A post shared by Josh, Jeremy, Brittany, Briana (@salyerstwins) on

- Advertisement -

इन्स्टाग्रामवर त्यांनी फोटो पोस्ट करताना म्हटले की, ‘आमची मुले फक्त चुलत भाऊ आणि बहीणच होणार नाही तर ते एका अनोख्या कहाणीचा भाग असतील. आम्ही त्या दिवसाची वाटत पाहात आहोत जेव्हा मुलं या जगात जन्माला येतील आणि सर्व काही बदलून जाईल.’

- Advertisement -

सध्या सोशल मीडियावर या दोन्ही जुळ्या जोडप्यांची कहाणी आणि फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. नेटकरी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावर करत आहे. तसेच त्याच्याबद्दल जबरदस्त पोस्ट लिहित आहेत. काहींना या जोडप्यांच्या मुलांची नावं देखील सुचवली आहेत. तर काहींना म्हटले की, ‘या दोघी एकत्र गर्भवती आहे. त्यामुळे असे होऊ नये की, त्यांच्या पोटी जुळीचं मुलं जन्म घेतील. हे जग आश्चर्यकारक आणि चमत्कारांनी भरलेले आहे. अनेक विचित्र कहाणी ऐकल्या आणि पाहिल्या आहेत.’


हेही वाचा – ५ वर्षाच्या चिमुकलीचा अद्भुत विक्रम, अवघ्या १३ मिनिटांत सोडले १११ बाण!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -