आता ट्वीटमध्ये करता येणार बदल; पण फोटो बदलल्यास ब्लू टिक…

एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर अनेक बदल केलेत. अशातच पुन्हा एकदा ट्विटर आपल्या यूजर्ससाठी ब्लू सब्सक्रिप्शनचे पॅकेज लॉन्च करणार आहे. सोमवारी ही सेवा सुरू करण्यात येणार असून, युजर्सना पैसे भरून ब्लू टिक मिळवता येणार आहे.

twitter

एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर अनेक बदल केलेत. अशातच पुन्हा एकदा ट्विटर आपल्या यूजर्ससाठी ब्लू सब्सक्रिप्शनचे पॅकेज लॉन्च करणार आहे. सोमवारी ही सेवा सुरू करण्यात येणार असून, युजर्सना पैसे भरून ब्लू टिक मिळवता येणार आहे. तसेच, कंटेंट एडिट व्यतिरिक्त इतरही अनेक सुविधा मिळणार आहेत. मात्र, अॅपल आयओएस वापरकर्त्यांसाठी ही सेवा महागणार आहे. (twitter blue launch on 12 December blue tick edit tweet feature)

सोमवारपासून ट्विटरने ब्लू सब्सक्रिप्शनचे पॅकेज लॉन्च केले. त्यानुसार, ट्विटरचे ब्लू सब्सक्रिप्शन प्रति महिना 8 डॉलर असेल. तसेच, अॅपल iOSसाठी प्रति महिना 11 डॉलर असेल. यावेळी ट्विटरद्वारे युझर्सच्या खात्यांची अधिक सखोल पडताळणी केली जाणार असून, अधिकृत युझर्सनाच ही सेवा मिळणार आहे. या सेवेसाठी ट्विटरचे कर्मचारी स्वत:च्या अकाऊंटचीही पडताळणी करणार आहे.

योग्य पडताळणीनंतरच यूजर्सला ब्लू टिक दिले जाणार आहे. यासोबतच यूजर्सना त्यांच्या ट्विटमधील कंटेंट एडिट करण्याचा अधिकारही मिळणार आहे. तसेच, युझर्सना 30 मिनिटांच्या आत आपल्या कंटेंटमध्ये बदल करता येणार आहे. शिवाय, 1080p व्हिडिओ देखील अपलोड करता येणार आहे. सोबतच लांबलचक ट्विटही करता येतात. सबस्क्रिप्शन घेणाऱ्या युजर्सच्या ट्विटला प्राधान्य मिळणार असून त्यांना त्याच युजर्सच्या तुलनेत 50 टक्के कमी जाहिराती दिसतील.

फोटो किंवा नाव बदलल्यानंतर ब्लू टिक काढली जाणार

जर वापरकर्त्यांनी त्यांच्या प्रोफाइलवरील फोटो किंवा नाव बदलले तर त्यांची ब्लू टिक काढण्यात येणार आहे. तसेच, पुन्हा पडताळणी केल्यानंतर त्यांना ब्लू टिक दिले जाणार आहे.

याआधी ट्विटरने निवडक ऑफिशिअल खात्यांसाठी “अधिकृत” लेबल सादर केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही हे अधिकृत लेबल देण्यात आले. मात्र, काही तासानंतर दिलेले अधिकृत लेबल काढून टाकण्यात आले आहे. अमेरिकन YouTuber मार्क्स ब्राउनलीने लेबल गायब झाल्याची माहिती ट्विट केली.


हेही वाचा – महापुरुषांचा अनादर करण्याची कल्पना स्वप्नातही…; राज्यपाल कोश्यारींचे अमित शाहांना पत्र