Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Twitter Blue Tick : 'या' ट्विटर युझर्सना परत मिळाली 'ब्लू टिक'!

Twitter Blue Tick : ‘या’ ट्विटर युझर्सना परत मिळाली ‘ब्लू टिक’!

Subscribe

वॉशिंग्टन : काही दिवसांपूर्वी, ट्विटरने (Twitter) सर्व खात्यांवरील ब्लू टिक (Blue Tick) काढून टाकली होती. मात्र आता ट्विटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी आपला हा निर्णय फिरवला आहे. वास्तविक, 10 लाख किंवा त्याहून अधिक फॉलोअर्स असलेल्या ट्विटर युजर्सना पुन्हा एकदा ब्लू टिक परत मिळाल्याचे सांगण्यात येते. तथापि, ट्विटरकडून याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. ट्विटरच्या नवीन पॉलिसीनुसार युजर्सना ब्लू टिक्स मिळवण्यासाठी पैसे द्यावे लागतात.

दोनच दिवसांपूर्वी भारतातील राजकारणातील अनेक दिग्गज नेत्यांपासून बॉलिवूड स्टारपर्यंत सर्वांची ट्विटरची ब्लू टिक हटवण्यात आली होती. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्याही ट्विटर अकाऊंटवरील ब्लू टिक हटविली होती. अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि सलमान खानपासून ते काँग्रेस नेते राहुल गांधी, अरविंद केजरीवाल आणि इतर अनेक भारतीय सेलिब्रिटींच्या ट्विटर अकाऊंटवरून देखील ‘ब्लू टिक’ हटवण्यात आली होती. एलॉन मस्कच्या ट्विटरने, प्रतिष्ठित ‘ब्लू टिक’ चिन्हासाठी दरमहा 650 रुपये शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. पैसे न भरणाऱ्यांच्या अकाऊंटवरील ही खूण काढण्यात आली आहे.

- Advertisement -

पण आता रोलिंग स्टोनमधील (Rolling Stone) एका अहवालानुसार, ट्विटरने 10 लाखांहून अधिक फॉलअर्स असणाऱ्या अकाऊंट युझर्सना ब्लू टिक पुन्हा देण्यात आली आहे. रविवारी सकाळी, 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या वापरकर्त्यांना सबस्क्राइब न करताच ब्लू टिक मिळाली. अनेक युझर्सनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली. मस्कने अनेक प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या ट्विटर खात्यांवर ब्लू टिक्स परत केल्या आहेत. विशेष म्हणजे, या युझर्सनी या सेवेसाठी कोणतेही सबस्क्रिप्शन घेतलेले नव्हते, तरीही त्यांची ब्लू टिक रिस्टोअर करण्यात आली आहे.

अमेरिकन न्यूयॉर्क टाइम्सला ट्विटरवर बिझनेस व्हेरिफिकेशन मिळाले आहे. मस्क यांनी या महिन्याच्या सुरुवातीला न्यूयॉर्क टाइम्सवर टीका करतानाच, त्याचे रिपोर्टिंग अपप्रचार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर न्यूयॉर्क टाइम्सचा गोल्ड व्हेरिफाइड मार्क ट्विटरने काढला होता. आता तो पुन्हा बहाल करण्याबरोबरच एनपीआर (नॅशनल पब्लिक रेडिओ) या अमेरिकन नॉन-प्रॉफिट मीडिया संस्थेला ट्विटर अकाऊंटवरील ब्लू टिक परत मिळाली आहे. विशेष म्हजे, ते आता सक्रिय अकाऊंट देखील नाही.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -