घरटेक-वेकTwitter ने पुन्हा रोखली ब्लू टिक देण्याची प्रक्रिया, जाणून घ्या कारण

Twitter ने पुन्हा रोखली ब्लू टिक देण्याची प्रक्रिया, जाणून घ्या कारण

Subscribe

Twitter ने पुन्हा एकदा ब्लू टिक देण्याची प्रक्रिया थांबवली आहे. या अगोदरही कंपनीने अनेक वेळा ब्लू टिक देण्याची प्रक्रिया बंद केली होती. यावर ट्विटरने स्पष्टीकरण देत सांगितले की, व्हेरिफिकेशन प्रोसेससाठी ब्लू टिक देण्याची प्रक्रिया काही काळ थांबवली आहे. यामुळे अ‍ॅप्लिकेशन आणि रिव्हू प्रोसेसला गती देण्याचे काम केले जाईल.

Twitter Verified हँडलने याबाबत माहिती देताना सांगितले की, ही प्रक्रिया सुधारत नाही तोपर्यंत ब्लू टिक देण्याची प्रक्रिया थांबवली जाईल. यात प्रक्रिया केव्हा सुरु होईल यासंदर्भात कोणत्याही तारखेचा उल्लेख केलेला नाही. याचा अर्थ, ब्लू टिकसाठी पुन्हा अप्लाय करण्यासाठी युजर्संना काही आठवडे किंवा काही महिने प्रतीक्षा करावी लागेल.

- Advertisement -

Independence Day 2021 : …तर राज्यात नाईलाजाने लॉकडाऊन लावावा लागू शकतो, मुख्यमंत्र्यांचा इशारा

- Advertisement -

Twitter याबद्दल वचन देत सांगितले की, लवकरच ही सेवा सुरु केली जाईल, मात्र ब्लू टिकची वाट पाहणाऱ्यांसाठी ही खूप निराशाजनक बातमी असल्याचे म्हणत युजर्सच्या संयमाचे कौतुक करुन हा प्रोम्बेम लवकरच सोडवण्याचा प्रयत्न करु असे सांगितले आहे. ट्विटरने पुढे म्हटले आहे की, अ‍ॅप्लिकेशन आणि रिव्हू प्रोसेसमध्ये काही सुधारणा करायच्या आहेत, जेणेकरून ही प्रक्रिया पुन्हा सुरु झाल्यास अधिकाधिक लोकांना ब्लू टिकसाठी अप्लाय करण्याचा पर्याय मिळेल.

आतापर्यंत मिळालेल्या अ‍ॅप्लिकेशन्सवर बोलताना Twitter ने म्हटले की, शक्य तितक्या लवकर सर्व अ‍ॅप्लिकेशनवर रिव्हू करण्याचा प्रयत्न करीत आहोत. यापूर्वी ट्विटरने अनेक फेकअकाउंट्सना ब्लू टिक दिले होते. यामुळे ट्विटरवर बरीच टीकाही झाली होती.


Independence Day 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आता ‘सबका प्रयास’ची नवी घोषणा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -