घरदेश-विदेशजगभरातील अनेक देशात ट्विटर डाऊन; 'तुम्ही ट्विट लिमिट पार केलीय', असा लोकांना...

जगभरातील अनेक देशात ट्विटर डाऊन; ‘तुम्ही ट्विट लिमिट पार केलीय’, असा लोकांना मेसेज

Subscribe

ट्विटर सपोर्टने ट्विट करून ही माहिती दिली. ट्विटर टीम युजर्सच्या समस्या सोडवण्यासाठी सक्रिय झाली आहे. ट्विटरवरची ही समस्या दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Twitter Down: जगभरात अनेक देशामध्ये ट्विटर डाउन झालंय. यामुळे युजर्सना ट्वीट करता येत नाहीय. युजर्सना विविध प्रकारचे मेसेज येत आहेत. बुधवारी रात्री उशिरा ही समस्या निर्माण झाली. ट्विटर टीम युजर्सच्या समस्या सोडवण्यासाठी सक्रिय झाली आहे. ट्विटरवरची ही समस्या दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ट्विटर सपोर्टने ट्वीट करून ही माहिती दिली. हजारो युजर्सनी त्यांना सेवांमध्ये अडचण येत असल्याची माहिती देऊन ट्वीट केल्यानंतर स्पष्टीकरण देण्यासाठी ट्विटर सपोर्टने ट्वीट केलं. सीईओ इलॉन मस्क यांनी अमेरिकेतील युजर्सना ४ हजार शब्दांपर्यंत ट्वीट करण्याची सुविधा सुरू केल्यावर ट्विटरमध्ये ही अडचण आल्याचे बोलले जात आहे. हे फीचर लॉंच झाल्यानंतर काही वेळातच ट्विटर डाउन झाले.

- Advertisement -

इलॉन मस्क यांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच ट्विटर डाउन
अमेरिकेतील प्रतिष्ठित वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टने ट्विटरच्या डाउनवर वृत्त दिले आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार, इलॉन मस्क यांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच लोकांना या समस्येचा सामना करावा लागला आहे.

- Advertisement -

तुमची ट्वीट करण्याची मर्यादा संपली आहे, असा संदेश
ट्विटर डाऊन झाल्याची माहिती देताना अनेक युजर्सनी सांगितले की, ट्वीट केल्यानंतर त्यांना तुमची ट्वीट करण्याची मर्यादा पूर्ण झाल्याचा संदेश मिळत आहे. एका यूजरने सांगितले की, तुम्ही ट्वीट करण्याची मर्यादा ओलांडली आहे. असा मेसेज मिळत आहे.

पोस्ट करण्यात अडचणी

युजर्सना डायरेक्ट मेसेज पाठवण्यात, इतर अकाउंट फॉलो करण्यात आणि कमी कालावधीत त्यांची पोस्ट शेअर करण्यात अडचणी आल्या. बर्‍याच युजर्सनी ट्विटरवर तक्रार केली की साइट रिफ्रेश केल्याबरोबर, त्यांना त्यांच्या सूचना लोड होत नसल्याचे आढळले, साइट रिफ्रेश केल्यानंतरही जुने ट्विट पॉप अप होत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -