Twitter Down : ट्वीटरची सेवा ठप्प, सोशल मीडियावर युजर्सच्या तक्रारींचा पाऊस

# Twitter Down सुद्धा सोशल मीडियावर ट्रेंड सुद्धा होत आहे. या सगळ्यावर आम्ही लवकरच सेवा सूर करू असे ट्वीटर कडून सांगण्यात आले.

Twitter rolls out Safety Mode to block accounts for using harmful language

मायक्रो ब्लॉगिंग आणि सोशल नेटवर्किंग साइट ट्वीटरची सेवा अचानक ठप्प झाली. आणि त्याच संदर्भात ट्वीटरच्या अनेक युजर्सनी तक्रारी दाखल केल्या. त्याचसोबत युजर्सना ट्वीटर ऍक्सेस(Twitter Down) करण्यास सुद्धा अडचणी येत आहेत. त्याच सोबत ट्वीट करणे आणि ट्वीट बघण्यातसुद्धा व्यत्यय येत आहे. त्याच बरोबर # Twitter Down सुद्धा सोशल मीडियावर ट्रेंड सुद्धा होत आहे. या सगळ्यावर आम्ही लवकरच सेवा सूर करू असे ट्वीटर कडून सांगण्यात आले.

हे ही वाचा –  राजकारणातली ‘ही’ जोडी माहितीय का तुम्हाला ? भरत दाभोळकरांच्या पोस्टची चर्चा

आपोआप लॉग आऊट होत आहे अकाउंट

ट्वीटरची सेवा ठप्प(Twitter Down) झाली आहे अशी माहिती सोशल मिडियावर युजर्स देत असताना महणाले ओव्हर कपॅसिटी मुळे हा व्यत्यय आलेला आहे. आणि त्यामुळेच हा एरर येत आहे आणि याच मुळे कुणीही ट्वीट करू शकत किंवा किंवा आलेले ट्वीट पाहू शकत नाही. तर याच संदर्भात काही युजर्सचे असेही म्हणाणे आहे की, ट्वीटर अकाउंट वापण्यासाठी सुरु (ओपन) केले असता ते आपोआप लॉग आऊट सुद्धा होते.

twitter down

हे ही वाचा –  ‘हम दो हमारे दो’ संकल्पना मान्य नाही, असदुद्दीन ओवैसींनी सांगितलं कारण

या आधी सुद्धा ट्वीटर सेवा ठप्प झाली होती

ज्या प्रमाणे आज ट्वीटरची सेवा ठप्प(Twitter Down) झाली त्या प्रमाणे या आधीही ट्विटर सेवा ठप्प झाली होती. याच वर्षी म्हणजे फेब्रुवारी २०२२ रोजी ट्वीटर सेवा ठप्प झाली होती. त्यावेळी एका आठवड्यात चक्क दोन वेळा ट्वीटर सेवा ठप्प झाली होती. आणि त्याही वेळा ट्वीटरच्या युजर्सना ट्वीटर वापरण्यास समस्या आली होती. युजर्सनी सांगितल्या प्रमाणे ट्वीटर ओपन केल्यावर ‘something went wrong , try reloading’ असा मेसेज सुद्धा दिसत होता.

हे ही वाचा –  गुगलवरून बँक हेल्पलाईन नंबर घेणे पडले महागात, हिमाचलमधल्या माजी सैनिकाला २० लाखांचा…