घरदेश-विदेश'खासगी सर्कल'चे ट्वीट सार्वजनिक केल्याबद्दल ट्विटरने मागितली माफी; नेमका काय आहे प्रकार

‘खासगी सर्कल’चे ट्वीट सार्वजनिक केल्याबद्दल ट्विटरने मागितली माफी; नेमका काय आहे प्रकार

Subscribe

मुंबई | ट्विटरमधील (Twitter) सुरक्षा उल्लंघनामुळे (Security Breach) खासगी सर्कलचे ट्वीट सार्वजनिक झाल्याचा दावा एका ट्विटर वापरकर्त्यांनी गेल्या महिन्यात केला होता. या प्रकारानी ट्विटरकडून झालेल्या गैरसोयीबद्दल ट्विटर वापरकर्त्याची माफी मागितली आहे. ट्विटरने एका महिन्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कबूल करत म्हणाले की, वैयक्तिक ट्वीटचा खुलासा या वर्षाच्या सुरुवातीला घडलेल्या एका सुरक्षिततेच्या घटनेची माहिती दिली आहे. यावेळी ट्विटरने या युझर्सना पाठवलेल्या मेलचा हवाला दिला आहे, अशी माहिती दिली आहे.

ट्वीटरने समस्या त्वरित दुरुस्ती केली असून यामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल ट्विटरने वापरकर्त्यांची माफी मागितली आहे. या खासगी सर्कलमध्ये विशिष्ट लोक सामील होऊ शकतील. यासाठी ट्विटर सर्कल ही संकल्पना सुरू करण्यात आले. यामुळे विशिष्ट लोक यात सहभागी होऊ शकतात, असे मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ठरविले आहे.

- Advertisement -

ट्विटर सर्कल म्हणजे काय ?

ट्विटर सर्कल, ट्वीटरने ही संकल्पाना गेल्या वर्षी सुरू केली आहे. ही मायक्रो-ब्लॉगिंग सेवा असून इंस्टाग्रामच्या ‘क्लोज फ्रेंड’ स्टोरी फीचरला मिळालेल्या भरगोस प्रतिसादानंतर ट्वीटरने देखील ही सेवा सुरू केली. जेव्हा ट्विटर वापरकर्ता हा पर्याय निवडेल. तेव्हा ट्विटर वापरकर्त्यांनी निवडलेल्या क्लोज फ्रेंड हे ट्वीट पाहू शकतात. इतर कोणीही ते ट्वीट पाहू शकणार नाही. ट्वीटर वापरकर्त्यांना फॉलो करणारे प्रत्येक व्यक्ती ते खासगी ट्वीट पाहू शकत नाही. जेव्हा ट्विटर वापरकर्ता फक्त क्लोज फ्रेंडच्या यादीत ज्यांना निवडले तिच क्लोज फ्रेंड हे ट्वीट पाहू शकतात किंवा त्यावर टिप्पणी करू शकतात.

- Advertisement -

ट्विटरने ही खाजगी पोस्ट ही हिरव्या रंगाचे वर्तुळ ट्वीट किंवा इंस्टाग्राम स्टोरीसाठी वापरले आहे. उदा. हिरव्या रंगाचे वर्तुळ दिसत नाही. आणि ज्यांना हिरवा रंगाचे वर्तुल दिसले तर कळते की, हे ट्वीट खासगी असून सार्वजनिक नाही हे कळते.

घोटाळेबाज व्हॉट्सअॅपवर व्हॉइस

अनेक युजर्स व्हॉट्सअॅपवर आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल येतात. हे कॉल स्कॅमर्सचे असू शकतात. हे कॉल इथिओपिया (+२५१), इंडोनेशिया (+६२), केनिया (+२५४), व्हिएतनाम (+८४), मलेशिया (+६०) आणि अन्य आंतरराष्ट्रीय क्रमांकवारून येत आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -