घरदेश-विदेशआप नेते संजय सिंह यांनी ट्विट केलेला व्हिडीओ दिशाभूल करणारा, ट्विटरचे स्पष्टीकरण

आप नेते संजय सिंह यांनी ट्विट केलेला व्हिडीओ दिशाभूल करणारा, ट्विटरचे स्पष्टीकरण

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हिडिओ क्लिप शेअर करण्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ट्विटरने आप नेते संजय सिंह यांच्या ट्विटला दिशाभूल करणारे म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने सातत्याने तो व्हिडिओ अपूर्ण असल्याचे सांगितले जात होते.

आपचे संजय सिंह यांनी केलेल्या ट्विटमध्ये संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये निरोप समारंभात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना अभिवादन करणाऱ्या नेत्यांचा व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये पीएम मोदी शुभेच्छा देताना दुसरीकडे पाहताना दाखवण्यात आले होते. यावेळी मंत्री पियुष गोयल यांच्यासह इतर संसद सदस्य राष्ट्रपतींना अभिवादन करताना दिसत होते.

- Advertisement -

एका कार्यक्रमावरून दिल्ली सरकार आणि पंतप्रधान कार्यालयात वाद सुरू असतानाच संजय सिंह यांची ही पोस्ट समोर आली आहे. संजय सिंह यांनी केलेले ट्विट वेगाने व्हायरल होत आहे. या ट्विटला अधिक लाईक्स मिळत आहेत.

- Advertisement -

काय आहे दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार मधील वाद –

दिल्लीचे केजरीवाल सरकार आणि उपराज्यपाल यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. दिल्ली सरकारच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचे पोस्टर जबरदस्तीने लावले जात असल्याचा आरोप केजरीवाल सरकारने केला आहे. दिल्ली सरकारचा ‘वन महोत्सव’ कार्यक्रम होता, ज्यामध्ये मुख्यमंत्री केजरीवाल आणि उपराज्यपाल दोघे येणार होते. या कार्यक्रमापूर्वी दिल्ली पोलिसांनी पंतप्रधान मोदींचे पोस्टर लावले आणि हा फोटो काढून टाकल्यास कारवाई केली जाईल असे सांगितले, असा आरोप दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी केला आहे

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -