घरटेक-वेकभारतातील ट्विटरच्या पब्लिक पॉलिसी हेड महिमा कौल यांचा राजीनामा

भारतातील ट्विटरच्या पब्लिक पॉलिसी हेड महिमा कौल यांचा राजीनामा

Subscribe

भारतातील ट्विटरच्या पब्लिक पॉलिसी हेड महिमा कौल यांचा राजीनामा दिल्याची माहिती मिळतेय. ट्विटरने असे म्हटले आहे की, महिमा कौल या मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत ट्विटरसोबत काम करतील आणि त्यांच्या पदाची जबाबदारी सांभाळतील. तर महिमा कौल यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ट्विटरच्या पब्लिक पॉलिसी हेड या पदाचा राजीनामा दिल्याचे ट्विटरने सांगितले आहे. ट्विटरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ट्विटरच्या भारत आणि दक्षिण आशिया पब्लिक पॉलिसी हेड महिमा कौल यांनी आपले पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी त्या मार्च अखेरपर्यंत आपल्या पदाची अधिकृत जबाबदारी सांभाळणार आहे. तसेच ५ वर्ष केलेल्या आपल्या कामानंतर कौटुंबिक जबाबदारी, वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हे पद जरी सोडण्याचा निर्णय घेतला असला तरी महिमा कौल यांचा राजीनामा ट्विटरसाठी नुकसान आहे, असे देखील ट्विटरकडून सांगण्यात आले आहे.

देशात सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनादरम्यान विदेशी सेलिब्रिटींच्या ट्वीटवरून जोरदार चर्चा सुरू असतात, असा परिस्थितीतच ट्विटरच्या पब्लिक पॉलिसी हेड महिमा कौल यांनी राजीनामा दिल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते. तर  ट्विटरने गेल्या आठवड्यात काही अकाऊंट्सही ब्लॉक केली होती. शेतकरी आंदोलनाशी संबंधित पोस्टमुळे ही अकाऊंट्स बंद करण्याची सूचना सरकारने केल्यानंतर ट्विटरने संबंधित अकाऊंट्सवर कारवाई केली होती. या प्रकरणाशी कौल यांच्या राजीनाम्याचा संबंध नाही, असे ट्विटरमधील सूत्रांकडून सांगितले गेले आहे. कौल याच्याकडे मार्चअखेरपर्यंत पदाची सूत्रे कायम राहतील, असे ट्विटरने प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकाद्वारे सांगितले आहे.

- Advertisement -

शेतकरी आंदोलनादरम्यान विदेशी सेलिब्रिटींच्या ट्विटवरून भारतात चर्चा सुरू आहे. वेबसाइटच्या अशा विवादास्पद वेळी कौल यांच्या राजीनाम्याची बातमी समोर आली, जेव्हा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने “शेतकऱ्यांचा कत्तल” आणि “भारतीय कायद्याचे उल्लंघन” संबंधित ट्विट हटवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. दरम्यान २५० पेक्षा ट्विटर अकाऊंट्स खाती आणि पोस्ट ब्लॉक न केल्याबद्दल कंपनीला शिक्षा देण्याची धमकी देत ​​मंत्रालयाने ट्विटरला नोटीस देखील पाठवली होती.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -