घर ताज्या घडामोडी एलॉन मस्कचा दणका; आजपासून ट्विटरची कर्मचारी कपात सुरू

एलॉन मस्कचा दणका; आजपासून ट्विटरची कर्मचारी कपात सुरू

Subscribe

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी आपल्याकडे घेतल्यापासून त्यामध्ये सातत्याने बदल करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. सध्या एलॉन मस्क यांनी खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे खर्च कमी करण्यासाठी ट्विटरमधील कर्मचाऱ्यांची कपात सुरू करण्यात आली आहे.

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी आपल्याकडे घेतल्यापासून त्यामध्ये सातत्याने बदल करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. सध्या एलॉन मस्क यांनी खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे खर्च कमी करण्यासाठी ट्विटरमधील कर्मचाऱ्यांची कपात सुरू करण्यात आली आहे. तसेच, कंपनीच्या पायाभूत सुविधांच्या खर्चाची किंमत कमी करून मस्कला सुमारे 82 डॉलर बिलियनची बचत करायची असल्याची माहिती मिळते. (twitter layoffs to begin today musk to cut costs by one billion dollar)

मिळालेल्या माहितीनुसार, मस्कने ट्विटर इंकार्पोशेनच्या नवीन व्यवस्थापकांना पायाभूत सुविधांची किंमत कमी करण्यासाठी पावले उचलण्यास सांगितले आहे. तसेच, ट्विटरचा खर्च वर्षाला 1 डॉसर बिलियनने कमी करायचा आहे. त्यामुळे खर्चात कपात करण्यासाठी मस्कने या योजनेला ‘डीप कट्स प्लॅन’ असे नाव दिले असल्याचेही या व्यवस्थापकांनी सांगितले.

- Advertisement -

एका अंतर्गत ट्विटर संदेशात म्हटले आहे की, खर्च कपात योजनेशी परिचित असलेल्या स्त्रोतांनुसार, सर्व्हर आणि क्लाउड सेवांमधून दररोज 1.5 डॉलर दशलक्ष ते 3 डॉलर दशलक्ष बचत करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. तसेच, अंतर्गत कागदपत्रांनुसार, ट्विटरला सध्या दिवसाला 3 दशलक्ष डॉलर्सचे नुकसान होत आहे. मात्र, या योजनेबाबत अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

ट्विटरच्या सूत्रांनी सांगितले की, पायाभूत सुविधांच्या खर्चात मोठी कपात केल्यामुळे महत्त्वाच्या राजकीय आणि इतर कार्यक्रमांदरम्यान ट्विटरची वेबसाइट आणि अॅप धोक्यात येऊ शकते. जेव्हा मोठ्या संख्येने वापरकर्ते त्याची सेवा वापरण्यासाठी जातात, तेव्हा ते डाउन होऊ शकते.

- Advertisement -

एलॉन मस्क म्हणाले की, त्यांना ट्विटर आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवायचे आहे, त्यामुळे शुक्रवारपासून कर्मचार्‍यांची कपात सुरू होत आहे. या दिशेने त्यांनी पहिल्या दिवसापासून मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली. प्रथम, त्यांनी सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. याशिवाय, ट्विटरच्या निम्म्या कर्मचाऱ्यांवर कामावरून कमी करण्याची टांगती तलवार आहे. अमेरिकन मीडिया हाऊस ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, 4 नोव्हेंबरला ट्विटरच्या 3,700 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहेत. कंपनीच्या 7,500 कर्मचाऱ्यांपैकी हे प्रमाण जवळपास 50 टक्के आहे.


हेही वाचा – एलॉन मस्क येताच ट्विटरच्या कर्मचाऱ्यांचा ताप वाढला; दरदिवशी करताहेत 12 तास काम

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -