Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर टेक-वेक केंद्राच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे Twitter ला पडले महाग, कायदेशीर कारवाईला जावे लागणार...

केंद्राच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे Twitter ला पडले महाग, कायदेशीर कारवाईला जावे लागणार सामोरे

माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ७९च्या अंतर्गत ट्विटरला मिळालेला सुरक्षेचा अधिकार आता ट्विटरकडून काढून घेण्यात आलाय.

Related Story

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकार आणि ट्विटर (Twitter) यांच्यात सुरु असलेला वाद आता चांगलाच पेटला आहे. केंद्र सरकारकडून वारंवार सूचना देऊनही ट्विटरने केंद्र सरकारच्या नव्या नियमांचे पालन केले नाही. ट्विटरचे हेच वागणे आता अंगाशी आले आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ७९च्या अंतर्गत ट्विटरला मिळालेला सुरक्षेचा अधिकार आता ट्विटरकडून काढून घेण्यात आलाय. अशाप्रकारे ट्विटरला केंद्र सरकारने जोरदार दणका दिला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे पुढील काळात कोणत्याही ट्विटर युझरने बेकायदेशीर किंवा आक्षेपार्ह, चिथावणीखोर ट्विट केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही ट्विटरची असणार आहे. या प्रकरणी पोलिसांकडून कंपनीच्या संचालक वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. (twitter lose legal protection rules intermediary status ended twitter will face legal action)


केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यात सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी नवीन नियमावली जाहिर केली. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनी या नवीन नियामांचे पालन करण्यासाठी केंद्र सरकारने २५ मे पर्यंतचा वेळ दिला होता. ट्विटर वगळता इतर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनी केंद्रांच्या नवीन नियमावली आमलात आणल्या परंतु ट्विटरने केंद्राच्या सर्व नियमांकडे वारंवार दुर्लक्ष केले. ट्विटरला वारंवार सूचना देऊनही कंपनीने कोणतीही ठोस पाऊले उचलली नाहीत. नव्या नियमांचे पालन करण्यासाठी ट्विटरला ५ जून पर्यंत नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र तरीही केंद्राच्या नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे केंद्र सरकारला ठोस पाऊले उचलावी लागल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.

- Advertisement -

नव्या नियमांचे पालन करण्यासाठी आम्हाला शक्य असतील तितके प्रयत्न करत आहोत. एक अंतरिम मुख्य अधिकारी नियुक्त केला आहे. त्याचा तपशील माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला द्यायचा असल्याचे ट्विटरच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे आमच्याकडून प्रत्येक टप्प्यावर घेण्यात येणाऱ्या निर्णयांची माहिती मंत्रालयाला दिली जाईल, असेही ट्विटरने म्हटले आहे.


हेही वाचा – दहा हजार फॉलोअर्स असणाऱ्या युझर्ससाठी Twitter लाँच करणार सुपर फॉलोअर्स टूल

- Advertisement -

 

 

 

 

 

- Advertisement -