घर देश-विदेश तरूणाईला आकर्षित करण्यासाठी ट्विटरचे मिशन #PowerOf18

तरूणाईला आकर्षित करण्यासाठी ट्विटरचे मिशन #PowerOf18

Subscribe

तरूणाईला १८ वर्षे वय गाठल्यानंतर काय महत्वाचे वाटत असे विचारल्यावर मतदानाचा हक्क हा महत्वाचा म्हणून प्रतिसाद देण्यात आला आहे. ट्विटरमार्फत झालेल्या सर्वेक्षणातून हे समोर आले आहे. तरूणाईमध्ये सामाजिक सहभाग वाढावा म्हणून ट्विटरने #PowerOf18 ही मोहीम जाहीर केली आहे. ट्विटरवर होणार्‍या चर्चांमध्ये तरूणाईचा सहभाग वाढावा हे या मोहिमेतून अपेक्षित आहे. ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डॉर्सी यांनी आयआयटी दिल्ली येथे या मोहिमेची घोषणा केली.

या सर्वेक्षणाअंतर्गत १८ ते ३० वयोगटातील ३६०० जणांनी सहभाग घेतला होता. नवमतदारांमधील राजकीय आणि सामाजिक जाणिवता या विषयावर आधारीत हे सर्वेक्षण होते. तीनपैकी दोन ट्विटर वापरणार्‍या तरूणांना ट्विटरवर चालणार्‍या चर्चांमध्ये असलेला सहभाग हा राजकारणातील थेट सहभाग वाटतो. ट्विटर इंडिया #PowerOf18 च्या माध्यमातून तरूण सेलिब्रिटींच्या मदतीने व्हिडिओ सिरीजही सुरू करणार आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -