घरटेक-वेकआता दोन युजर्सना एकत्रित करता येणार एकच ट्विट; Twitter चं नवं Co-Tweets...

आता दोन युजर्सना एकत्रित करता येणार एकच ट्विट; Twitter चं नवं Co-Tweets फीचर

Subscribe

आता तुम्ही तुमच्या मित्रासोबत मिळून एकच ट्विट करु शकणार आहात, ट्विटरकडून लवकरचं युजर्ससाठी ही खास सुविधा सुरु होणार आहे. ट्विटरने एका फीचरची टेस्टिंग सुरु केली आहे, ज्यात युजर्सना एक ट्विट को- ऑथर करण्यास सक्षम करेल. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, या फीचरमुळे दोन युजर्सना मिळून एक ट्विट पोस्ट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे तुम्ही मित्रासोबत मिळून एक ट्विट करु शकणार आहेत. को ट्विट असे या फीचरचे नाव आहे.
यामुळे एकाच वेळी दोन युजर्सना स्पॉटलाईट शेअर करण्यासह, त्यांचे कॉन्ट्रिब्यूशन शोकेस करणे आणि अधिक लोकांपर्यंत जोडण्यास मदत होणार आहे.

ट्विटरचे को ट्विट हे फीचर त्या क्रिएटर्स आणि ब्राँड्ससाठी आहे जे प्लॅटफॉर्मवर कंटेंट आणि कॅम्पेनला मदत करु इच्छितात. इन्स्टाग्रामवरील कोलॅबोरेशन फीचरप्रमाणे हे फीचर आहे. ट्विटरच्या को-ट्विट फीचरची सर्वप्रथम अॅप रिसर्चर अलेसेंड्रो पलुझी यांनी यावर्षी एप्रिलमध्ये दखल घेतली होती. आणि आता कंपनीने या फीचरबद्दल अधिकृतपणे पुष्टी केली आहे.

- Advertisement -

को-ट्विट नेमक आहे कसं?

ट्विटरने स्पष्ट केल्याप्रमाणे, सह-ट्विट हे को-ऑथर ट्विट आहे जे ऑथरच्या प्रोफाइल आणि त्यांच्या फॉलोअर्सच्या टाइमलाइन दोघांवर एकाच वेळी पोस्ट केले जाऊ शकते. ट्विटरवर एक को- ट्विट हेडरमध्ये दोन ऑथरचे प्रोफाइल फोटो आणि युजर्सचे नावे पाहून को-ट्विट ओळखू शकतात. एका वेळी फक्त दोन ऑथर एक को-ट्विटमध्ये ट्विट करू शकतात.

- Advertisement -

को-ट्विट फीचर कसे काम करते?

ट्विटरचे को-ट्विट फीचर वापरण्यास सोपे आहे. दोन ऑथरनी ट्विटचा कंटेंट ठरवल्यानंतर, यातील एका ऑथर को-ट्विट करु शकेल पण त्याला दुसऱ्या को-ऑथरला इनवाइट करणे आवश्यक आहे. जेव्हा को-ऑथर को-ट्विट इनवाइट स्विकारतो, तेव्हा CoTweet लगेच दोन्ही ऑथरच्या प्रोफाइलवर आणि त्यांच्या फॉलोअर्सच्या टाइमलाइनवर पोस्ट होते. को-ट्विट इनवाइट पाठवल्यानंतर को-ट्विटचा कंटेंट एडिट किंवा एडजस्ट केला जाऊ शकत नाही. तसेच एक ट्विटर युजर त्याच लोकांना को-ट्विटसाठी इनवाइट करू शकतो जे मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर त्यांना फॉलो करतो किंवा त्यांच्याकडे पब्लिक अकाउंट्स आहे.


नात्यातील दुराव्यात पुरुषाला बलात्काराचा आरोपी मानता येणार नाही, केरळ उच्च न्यायालयाचे मत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -