घरदेश-विदेशट्विटरने उमर खालिदच्या अकाऊंटवरील ‘ब्लू टिक’हटवली

ट्विटरने उमर खालिदच्या अकाऊंटवरील ‘ब्लू टिक’हटवली

Subscribe

ब्लू टिकवरुन वाद सुरू 

गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नवीन नियमावलीनुसार ट्विटर आणि केंद्र सरकार असा वाद सुरु आहे. यातच देशातील अनेक बड्या नेत्यांपासून ते उद्योजकांपर्यंतच्या ट्विटर हॅण्डलसमोरील ब्लू टिक ट्विटरने हटवली आहे. यात
दिल्ली दंगलीशी संबंधित प्रकरणातील आरोपी आणि जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याच्या ट्विटर अकाउंटवरील ब्लू टिक काढून टाकली आहे.

उमर खलिद याचे हे वैयक्तिक ट्विटर अकाऊंट आहे. परंतु सप्टेंबर २०२० म्हणजे गेल्या ९ महिन्यांपासून उमर खालिदच्या ट्विटर हॅण्डलवरून एकही ट्विट केलेले नाही. ट्विटरने म्हटले आहे की, जर एखादे ट्विटर हॅण्डल ६ महिन्यांपर्यंत अजिबात सक्रिय नसेल तर त्यावरील ब्लू टिक हटवली जाईल.

- Advertisement -

दिल्ली दंगलीच्या वेळी उमर खालिदवर हिंसा भडकवल्याचा आरोप होता, याप्रकरणी तो बराच काळ तुरूंगातही होता. अलीकडेच तो चर्चेत आला होता याचे कारण म्हणजे जेव्हा दिल्ली पोलिसांनी उमर खालिद आणि खालिद सैफी यांना बेड्या ठोकत हजर करण्यास परवानगी मागितली होती, परंतु कोर्टाने ही परवानगी नाकारली होती.

ब्लू टिकवरुन वाद सुरू 

अलीकडेच ट्विटरद्वारे ब्लू टिक म्हणजेच ट्विटर व्हेरिफिकेशन संदर्भात नवीन धोरण सुरू करण्यात आले आहे. अलीकडेच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, संघ प्रमुख मोहन भागवत यांच्यासह इतर अनेक बड्या व्यक्तींच्या ट्विटर हॅण्डलवरील ब्लू टिक काढून टाकण्यात आले होते. ज्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. ट्विटरने केलेल्या या कारवाईविरोधात भारत सरकारने आक्षेप घेतला, त्यानंतर ट्विटरने या नेत्यांच्या अकाउंटवरील ब्लू टिक पुन्हा परत केले भारत सरकार आणि ट्विटर यांच्यात बरीच काळापासून नवीन आयटी नियमांवरून वाद सुरू आहे. ट्विटर नियमांचे पालन करण्यासाठी काही अवधी मागत आहे, तर सरकारकडून पुन्हा यावर दबाव आणला जात आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -