अखेर प्रतिक्षा संपली! Twitter युजर्ससाठी एडिट बटण होणार जारी

यापूर्वी प्लॅटफॉर्मने डाउनव्होट ऑप्शनची टेस्ट केली होती. आता हे ऑप्शन थेट नोटिफिकेशन पॅनलमध्ये लाईकच्या पर्यायासह उपलब्ध आहे.

twitter rolling out edit button but only for some users

गेल्या बऱ्याच दिवसांपासून ट्विटरच्या एडिट बटणावर काम सुरु आहे. या फिचरची ट्विटर युजर्सकडूनही मोठ्याप्रमाणात मागणी केली जात होती. एका नव्या अहवालानुसार, ट्विटरचं एडिट बटण हे काही ठरावीक युजर्ससाठी जारी करण्यात आले आहे. त्यामुळे हे एडिट बटण केवळ स्पेसिफिक प्रकरणातच वापर जाऊ शकते.

टिप्सस्टर मुकुल शर्माच्या मते, मायक्रो-ब्लॉगिंग साइट एक नवीन अपमानास्पद भाषा फिल्टर आणत आहे. यामुळे युजर्स आक्षेपार्ह ट्विट डिलीट करण्याऐवजी एडिट करू शकतील. हे फीचर युजर्सना ट्विट पोस्ट करण्यापूर्वी आक्षेपार्ह भाषा एडिट करण्यास सांगेल.

म्हणजेच मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर ट्वीट पोस्ट करण्यापूर्वी आक्षेपार्ह शब्दांवर लक्ष ठेवेल. यामुळे जेव्हा एखाद्या युजर्सला आक्षेपार्ह टिप्पणीसह ट्विट पोस्ट करायचे असेल तेव्हा त्याला ट्विट एडिट करणे, ट्विट डिलीट करणे आणि ट्विट पोस्ट करणे असे तीन पर्याय मिळतील.

याशिवाय, जर युजर्सने या फ्लॅगवर सहमती दर्शवली नाही, तर त्याला याबद्दल फीडबॅक शेअर करण्याचा पर्याय देखील असेल. रिपोर्टनुसार, एडिट बटन व्यतिरिक्त ट्विटर नोटिफिकेशन पॅनलमध्ये लाईक किंवा डिसलाइकच ऑप्शन देत आहे.

यापूर्वी प्लॅटफॉर्मने डाउनव्होट ऑप्शनची टेस्ट केली होती. आता हे ऑप्शन थेट नोटिफिकेशन पॅनलमध्ये लाईकच्या पर्यायासह उपलब्ध आहे. यासह,युजर्सला ट्विट ओपन करणे आणि त्याला लाइक किंवा डिसलाईक करण्याची आवश्यकता नाही.

तथापि, कंपनीने या दोन्ही फिचर्स बाबत अधिकृत घोषणा केलेली नाही, या फिचर्समधील एडिट बटण फिचर्स खूप उपयुक्त आहे. हे फिचर लवकरच सर्व युजर्ससाठी रिलीज केले जाऊ शकते. मस्क अधिकृत ट्विटर बॉस झाल्यानंतर हे बटण येऊ शकते.


चीनचा संधिसाधूपणा! रशिया-युक्रेन युद्धादरम्यान चीनच्या 29 लढाऊ विमानांची तैवानमध्ये घुसखोरी