घरदेश-विदेशटीम इंडियावरून ट्विटर वॉर, भाजपच्या पोस्टला रिप्लाय देत काँग्रेसने लिहिले...

टीम इंडियावरून ट्विटर वॉर, भाजपच्या पोस्टला रिप्लाय देत काँग्रेसने लिहिले…

Subscribe

टीम इंडियावरून आता काँग्रेस आणि भाजपमध्ये टोलेबाजी सुरू झाली आहे. कारण भाजपने भारतीय संघासाठी केलेल्या एका पोस्टला काँग्रेसने शेअर करत टोला लगावला आहे.

नवी दिल्ली : विश्वचषकाचा अंतिम सामना हा भारत वि. ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये खेळला जात आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या सामन्याचा थरार 140 करोड भारतीय व अन्य देशातील नागरिक अनुभवत आहेत. त्यामुळे या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. परंतु. टीम इंडियावरून आता काँग्रेस आणि भाजपमध्ये टोलेबाजी सुरू झाली आहे. कारण भाजपने भारतीय संघासाठी केलेल्या एका पोस्टला काँग्रेसने शेअर करत टोला लगावला आहे. (Twitter war over Team India, replying to BJP’s post, Congress wrote…)

हेही वाचा – चार शिलेदार तंबूत परतले; पण भारतच जिंकणार प्रियंकांना विश्वास, सांगितला इंदिरा गांधींचा ‘तो’ किस्सा

- Advertisement -

भाजपने त्यांच्या X या सोशल मीडिया साईटवरील त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. “Come on Team India! 🇮🇳🏏🏆 We believe in you!” अशी पोस्ट भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली आहे. या पोस्टला शेअर (रिट्विट) करत काँग्रेसने “True that! JEETEGA INDIA” असे लिहिले आहे. त्यामुळे आता नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एका नेटकऱ्याने “सौतन बनी सहेली” या विधानाला समर्पक फोटो शेअर करत कमेंट केली आहे. त्यामुळे भाजपच्या या पोस्टला टोला लगावत काँग्रेसने जिंकणार भारतच असे म्हटले आहे.

भारतीय संघाने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. परंतु, ही कामगिरी तेव्हाच महत्त्वाची ठरेल जेव्हा तिसऱ्यांदा भारताचे विश्वचषकावर नाव कोरले जाईल. पण कांगारूंचा संघही यावेळी फॉर्मात आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही पुन्हा विश्वचषक त्यांच्या मायदेशी घेऊन जाण्यासाठी जोरदार लढत देण्यात येत आहे. मात्र, यंदा विश्वचषक भारताचा संघच विजयी करणार असा विश्वास भारतीयांकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान आजच्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पर्यंत भारताचे 7 शिलेदार हे तंबूत परतले आहेत. त्यामुळे सध्या तरी हा सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजून झुकलेला असल्याचेच पाहायला मिळत आहे. तर भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शामी याच्याकडून सर्वच भारतीयांना अपेक्षा लागून राहिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -