Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश ...म्हणून Twitter ने Fleets फीचर बंद करण्याची केली घोषणा; वाचा सविस्तर

…म्हणून Twitter ने Fleets फीचर बंद करण्याची केली घोषणा; वाचा सविस्तर

Related Story

- Advertisement -

मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरने ३ ऑगस्ट रोजी फ्लीट फीचर बंद करण्याची घोषणा केली आहे. २०२० मध्ये, ट्विटरने भारत, दक्षिण कोरिया, इटली आणि ब्राझील या ठिकाणी टेस्टिंग म्हणून फ्लीट फीचर जाहीर केले होते. त्यानंतर ट्विटरने नोव्हेंबर २०२० मध्ये जागतिक स्तरावर हे फीचर लाँच केले. या फीचरद्वारे युजर्स फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत होते. जे २४ तासांनंतर आपोआप रिमूव्ह केले जायचे. परंतु ट्विटरने असे म्हटले की, ते हे फीचर रीमूव्ह करणार आहेत. कारण ते युजर्सना आकर्षित करण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरले आहेत.

ट्विटरने बुधवारी यांसदर्भातील माहिती ट्विट करून सांगितली आहे. या ट्विटमध्ये ट्विटरने असे म्हटले की, हे फ्लीट फीचर ३ ऑगस्टपासून काढून टाकले जाणार आहे. याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही यावेळी इतर काही गोष्टींवर काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. जागतिक स्तरावर सुरू झालेली हे फ्लीट फीचर तब्बल आठ महिन्यांनंतर काढून टाकण्याची घोषणा ट्विटरकडून करण्यात आली आहे.

- Advertisement -

…म्हणून ट्विटरने केली घोषणा

ट्विटरने असे सांगितले की, फ्लीट फीचर वापरणाऱ्या युजर्सची संख्या जशी आम्हाला अपेक्षित होती तशी ती नव्हती. तसेच दिवसेंदिवस या युजर्समध्ये घट होताना देखील समोर आले. या फीचरचा वापर करून युजर्स त्यांच्या आयडीवरून फोटो आणि व्हिडिओ शेअर करत होते. या फीचरचं वैशिष्ट म्हणजे २४ तासांनंतर हे फोटो आणि व्हिडिओ आपोआप रिमूव्ह होत होते. असे असले तरी ट्विटरने हे फीचर काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.


…अन्यथा आमचा लढा पुन्हा सुरु करु; संभाजीराजेंचा मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे इशारा

- Advertisement -