Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Monkypox: कोरोनानंतर जगाला आता 'मंकीपॉक्स'चा धोका, नेमका आहे कसा हा विषाणू?

Monkypox: कोरोनानंतर जगाला आता ‘मंकीपॉक्स’चा धोका, नेमका आहे कसा हा विषाणू?

Related Story

- Advertisement -

जगावरील कोरोना विषाणूचे संकट कमी नाही तोवर ब्रिटनेमध्ये मंकीपॉक्स विषाणूने हैदोस घातला आहे. ब्रिटनमध्ये आत्तापर्यंत मंकीपॉक्सच्या दोन घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संभाव्य लाटेच्या भीतीने आधीच जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या नागरिकांना आणखीन धक्का बसला आहे. पब्लिक हेल्थ वेल्स यांनी सांगितले की, मंकीपॉक्स दोन जणांना लागण झाल्याचे समोर आले असून हे दोघेही एकाच घरात राहतात. विदेशात त्यांनी मंकीपॉक्सचा संसर्ग झाल्याचे ते सांगतात. मंकी पॉक्स हा खूप जुना विषाणु असून आफ्रिकी देशांमध्ये तो अधिक आढळतो

यावर ब्रिटनच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्था वेल्सने (पीएचडब्ल्यू) म्हटले आहे की, मंकीपॉक्स विषाणुबाधित दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यापैकी एकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एका रुग्णावर अद्याप उपचार सुरु आहे. इंग्लंडची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. यावर ब्रिटनच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्था वेल्सचे सल्लागार रिचर्ड फेर्थ यांनी सांगितले की, ब्रिटनमध्ये आढळलेली मंकीपॉक्स विषाणुची घटना एक दुर्मिळ घटना आहे. या विषाणुपासून सर्वसामान्यांना धोका कमी आहे परंतु या विषाणुबाधित रुग्णांच्या संपर्क आलेल्या नागरिकांचे ट्रेसिंग सुरू केले आहे. यासंदर्भातील प्रोटोकॉल पालन करत मंकी पॉक्स विषाणुबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या जवळपास सर्व व्यक्तींची ओळख पटली आहे. परंतु संभाव्य संक्रमणाची शक्यता कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

‘मंकीपॉक्स’ विषाणू नेमका कसा आहे?

- Advertisement -

मंकी पॉक्स हा विषाणु प्रसार मुख्यत: मध्य आफ्रिका आणि पश्चिम आफ्रिकी देशातील दुर्गम उष्णकटीबंधीत घनदाट जंगलातून होत आहे. त्यामुळे त्याचे साधारण दोन प्रकार आहे. पहिला म्हणजे पश्चिम आफ्रिका आणि दुसरा मध्य आफ्रिका. अफ्रिकन देशांमध्ये हा विषाणु मोठ्याप्रमाणात पसरत आहे. परंतु मंकीपॉक्स हा विषाणु काही प्रमाणात स्मॉलपॉक्स विषाणुप्रमाणे असल्याने तो घातक नसल्याचे मत तज्ज्ञांनाकडून सांगण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याला एक झोनेसिस म्हटले आहे. याचा अर्थ हा विषाणु प्राण्यापासून मनुष्यांत संक्रमित होऊ शकते.

‘मंकीपॉक्स’ विषाणूची लक्षणे ?

मंकीपॉक्स विषाणुची लागण झालेल्या रुग्णाला सुरुवातीला ताप, डोकेदुखी, सूज येणे, पाठदुखी, वेदना होणे, स्नायू येणे आणि थकवा येणे ही सामान्य लक्षणे जाणवतात. यात चिकनपॉक्स आजाराप्रमाणेच शरीरावर मोठे पुरळ येतात. सतत ताप येत राहिल्यास शरीराच्या ही भागांवर पुरळ येण्यास सुरुवात होते. याची सुरुवात बहुतांश वेळा चेहऱ्यापासून होते आणि नंतर शरीरातील इतर भागांत पुरळ उठण्यास सुरुवात होते. हा सामान्यतः हातांचे तळवे आणि पायांच्या तळांमध्ये अधिक प्रमाणात पसरतो. या पुरळ्यांना सतत खाज येते आणि खाजेमुळे हे पुरळ शरीरातील इतर भागांमध्येही पसरतात. हे पुरळ सतत खाजवल्याने अनके जखमा होत आहेत. WHO च्या म्हणण्यानुसार, पॉलीमेरेस चेन रिएक्शन (पीसीआर) द्वारे विषाणुची डीएनए टेस्ट करणे ही मंकीपॉक्सची चाचणी करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. हा विषाणु साधारण १४ ते २१ दिवस जगू शकतो.

विषाणु किती धोकादायक आहे?

- Advertisement -

मंकीपॉक्स विषाणुच्या बऱ्याच प्रकरणांमध्ये सौम्य लक्षणे आढळली आहेत. परंतु काही प्रकरणांमध्ये चेचक या संसर्गजन्य आणि प्राणघातक विषाणूप्रमाणेही लक्षणे दिसली आहेत. परंतु ही लक्षणे काही दिवसांतच बरी होत आहे. अनेकदा मंकीपॉक्स हा विषाणू रुग्णाच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायकही ठरु शकतो. पश्चिम आफ्रिका देशामध्ये या विषाणुच्या संसर्गामुळे मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.

मंकीपॉक्स संसर्गास इतर प्राणीही जबाबदार

संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य विभागाने यावर प्रकाश टाकला की, खारूताई, उंदीर, डॉर्मिस आणि माकडांच्या विविध प्रजाची आणि इतर प्राण्यांमध्येही मंकीपॉक्स विषाणुचे घटक आढळत आहे. कारण घनदाट जंगलता इतर प्राणीही हा विषाणु आपल्यासह इतर ठिकाणी वाहून नेत आहे.


Corona Second Waveमध्ये ७१९ डॉक्टर्स दगावले; IMAने जारी केले आकडे


 

- Advertisement -