Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी नोटा बंदीच्या निर्णयानंतर राजस्थानमध्ये सापडली दोन कोटींची रोकड; हे घबाड कोणाचं?

नोटा बंदीच्या निर्णयानंतर राजस्थानमध्ये सापडली दोन कोटींची रोकड; हे घबाड कोणाचं?

Subscribe

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वसामान्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या नोटा बदलण्यासाठी कालावधीही जाहीर करण्यात आलाय. परंतु राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये मोठ्या प्रमाणात दोन कोटींहून अधिक रुपयांची रोकड सापडली आहे. तर एक किलो सोन्याचं घबाड देखील सापडलं आहे.

राज्य सरकारच्या सचिवालयाजवळ असलेल्या योजना भवनाच्या बेसमेंटमध्ये २ कोटी ३१ लाख रुपयांपेक्षा अधिकची रोकड आणि एक किलो वजनाचं सोन्याचं बिस्किट सापडलं आहे. बेसमेंटमध्ये सापडलेल्या नोटा २ हजार आणि ५०० रुपयांच्या आहेत. मात्र, हे रोकड आणि सोनं कोणाचं आहे, ते अद्याप समजू शकलेलं नाही.

- Advertisement -

या प्रकरणाबाबत माहिती समोर येताच सीएस उषा शर्मा, डीपीजी उमेश मिश्रा आणि जयपूरचे पोलीस आयुक्त आनंद श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषद घेतली. विरोधकांनी या प्रकरणावरून गेहलोत सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. एकीकडे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे कर्नाटकच्या शपथविधीवेळी नव्या सरकारचे अभिनंदन करत आहे. मात्र, दुसरीकडे याच सरकारचे बारा वाजले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, योजना विभागाच्या बेसमेंटमध्ये असलेल्या कपाटात घबाड सापडलं आहे. त्यामध्ये २००० रुपयांच्या ७ हजार २९८ नोटा आहेत. त्याचं मूल्य १ कोटी ४५ लाख ९६ हजार रुपये इतकं आहे. तसंच या कपाटात ५०० रुपयांच्या १७ हजार १०७ नोटा आढळून आल्या आहेत. एक किलो सोन्याच्या बिस्किटावर ‘मेड इन स्वित्झर्लंड’ असा उल्लेख आहे. तसेच बाजारात या सोन्याची किंमत ६२ लाखांच्या घरात आहे.


- Advertisement -

हेही वाचा : Karnataka CM: शपथ घेताच सिद्धरामय्यांचा गृहिणींना दिलासा, काढला ‘हा’ आदेश


 

- Advertisment -