घरदेश-विदेशधक्कादायक! 'त्या' अधिकाऱ्यांना पाकिस्तानमध्ये झाली होती मारहाण

धक्कादायक! ‘त्या’ अधिकाऱ्यांना पाकिस्तानमध्ये झाली होती मारहाण

Subscribe

पाकिस्तानमध्ये भारतीय उच्चायोगाच्या दोन अधिकाऱ्यांना सोमवारी ताब्यात घेण्यात आले होते. त्या नंतर त्यांना इस्लामाबादमध्ये सोडून देण्यात आले. मात्र या दोन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यासोबत झालेल्या वर्तणुकीचा खुलासा केला असून त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्या दोन कर्मचाऱ्यासोबत मारहाण झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच ते दोघेही एका कटात सामील असल्याचेही त्यांच्याकडून वधवून घेण्यात आल्याचे समजते.

हेही वाचा – मुंबईवरचा ‘लोड’ कमी होणार?; योगी सरकारचा महत्त्वाचा निर्णय

- Advertisement -

सोमवारी बेपत्ता झाले होते अधिकारी 

पाकिस्तानात भारतीय उच्चायोगाचे दोन अधिकारी बेपत्ता झाल्याची माहिती सोमवारी समोर आली होती. त्यांचा सगळीकडे शोध सुरू झाला. हे अधिकारी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधून बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यांना १५ ते १६ शस्त्रधारकांनी साधारण ८.३० च्या दरम्यान सोमवारी सकाळी पेट्रोल पंपावरून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली. त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून, हातात बेड्या घालून त्यांना घेऊन गेले. अपहरकर्त्यांनी या अधिकाऱ्यांचे काही व्हिडिओ बनवले असून ज्यामध्ये त्यांना एका कटात सामील असण्याची कबुली देण्याकरता भाग पाडण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -