घरताज्या घडामोडीCoronavirus: कोरोनापासून बचाव करण्यासाठी दोन मीटर अंतर पुरेसे नाही!

Coronavirus: कोरोनापासून बचाव करण्यासाठी दोन मीटर अंतर पुरेसे नाही!

Subscribe

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा असे सतत सांगितले जात आहे. मात्र सोशल डिस्टन्सिंगमध्ये किती अंतर ठेवणे गजरेचे आहे, याबाबत अमेरिकेच्या संस्थेने सांगितले आहे.

जगभरात कोरोना विषाणूनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. यादरम्यान जगात कोरोना विषाणूसंदर्भात अनेक खुलासे होत आहेत. अमेरिकन संस्थेच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणूपासून आपला बचाव करण्यासाठी खोकणाऱ्या आणि शिंकणाऱ्या व्यक्तीपासून दोन मीटर अंतर पुरेसे नाही आहे. एका संशोधनानुसार, कोरोना विषाणूचे कण प्रति चार किमी वेगाने वाहणाऱ्या हवेमधून सहा मीटरपर्यंत पोहोचू शकतात.

अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स अंतर्गत जर्नल ऑफ फिजिक्स ऑफ फ्युइड्समध्ये प्रसिद्ध केलेल्या संशोधनानुसार, जेव्हा हवेचा वेग शून्य असतो तेव्हा माणसाच्या खोकल्यामुळे लाळतील जलकण दोन मीटपर्यंत पोहोचू शकत नाहीत. पण जर हवेचा वेग चार किमी ते १५ किमी प्रति तासांच्यामध्ये असेल तर लाळेतील जलकण हवेच्या दिशेने सहा मीटरपर्यंत पोहोचू शकतात. १५ किमी प्रति तासाच्या वेगाने लाळचे जलकण हे १.६ सेकंदात सहा मीटरवर पोहोचतात. त्यामुळे कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी दोन मीटर अंतर पुरेसे नाही आहे. म्हणून गर्दीच्या ठिकाणी कोरोना विषाणूचा जास्त प्रादुर्भाव दिसून येत आहे.

- Advertisement -

वैज्ञानिकांचा असा विश्वास आहे की, घरामधील वातावरणात लाळेच्या जलकणांचा व्यवहार वेगळा असू शकतो. यावर अधिक अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. भिन्न वातावरणाच्या परिस्थितीत आपल्याला छोट्या कणांचे बाष्पीभवन यावर अधिक सखोल समजून घेणे गरजेचे आहे आणि त्याच्यावर काम सुरू आहे.

खोकला आणि जवळून संपर्कसाधल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचा सर्वाधिक धोका आहे. याच पार्श्वभूमीवर जगातील अनेक देशांमध्ये फेस मास्क अनिवार्य केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: अमेरिकेत मृतांचा आकडा वाढला; ९६ हजारहून अधिक जणांचे बळी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -