Thursday, February 18, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम धक्कादायक! उन्नाव पुन्हा हादरले, शेतात आढळले २ अल्पवयीन मुलींचे मृतदेह

धक्कादायक! उन्नाव पुन्हा हादरले, शेतात आढळले २ अल्पवयीन मुलींचे मृतदेह

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली असून एका शेतात दोन मुलींचे मृतदेह आणि एक तरुणी जखमी अवस्थेत आढळून आली आहे.

Related Story

- Advertisement -

संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या उन्नाव बलात्कार प्रकरणानंतर पुन्हा एक भयंकर प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा उन्नाव हादरुन गेले आहे. एका शेतात दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह आढळून आले आहेत. तर तिसऱ्या मुलीची प्रकृत्ती गंभीर आहे. सध्या तिच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरु असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. असोहा पोलीस स्टेशन परिसरातील बबुरहा या गावात ही धक्कादायक घटना घडली असून पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, प्राथमिक तपासात विषबाधेने मृत्यू झाल्याचे समोर आले असले तरी पोलीस याप्रकरणी अधिक शोध घेत आहेत.

नेमके काय घडले?

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, बबुरहा या गावातील एका जंगलामध्ये तीनही मुलींना ओढणीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी गावकऱ्यांनी धाव घेतली. त्यानंतर त्या तीनही मुलींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यातील दोन मुलींना मृत घोषित करण्यात आले. तर त्यातील एकीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे बोले जात आहे. या तिघी जणी आपल्या शेतात चारा आणण्यासाठी गेल्या होत्या. त्याच दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणाची माहिती मिळताच डीएम आणि अन्य अधिकारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले.

गाव आणि रुग्णालयात पोलीस बंदोबस्त तैनात

या घटनेमुळे संपूर्ण गाव आणि रुग्णालयातील परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी वेगाने तपास करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. या घटनेनंतर परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

“उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये घडलेली घटना फार गंभीर आहे. यामध्ये दोन दलित मुलींचे मृतदेह सापडले आहेत. तर एक गंभीर जखमी असून तिला एअर ambulanceद्वारे तातडीने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आम्ही आता कोणत्याही स्थितीत हाथरसची पुनरावृत्ती होऊ देणार नाही. बहिणींच्या सुरक्षिततेशी आणि सन्मानाशी कोणतीही तडजोड करणार नाही”.  चंद्रशेखर आझाद; आझाद समाज पक्षाचे नेते


हेही वाचा – Petrol Diesel Price: पहिल्यांच ‘या’ राज्यात पेट्रोल दराने गाठली शंभरी!


 

- Advertisement -