घरताज्या घडामोडीजम्मू-कश्मीर लष्करी तळाजवळ घिरट्या घालणाऱ्या ड्रोनला सुरक्षा रक्षकांनी पिटाळले

जम्मू-कश्मीर लष्करी तळाजवळ घिरट्या घालणाऱ्या ड्रोनला सुरक्षा रक्षकांनी पिटाळले

Subscribe

दहशतवाद्यांनी लष्करी तळाला पुन्हा एकदा ड्रोनने लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान बाळगत या ड्रोनवर २५ राऊंड फायरिंग करत ड्रोनला पिटाळून लावले

जम्मू-कश्मीर हवाईदलाच्या तळावर ड्रोन अटॅक झाल्याच्या घटनेला २४ तास उलटत नाही तोच दहशतवाद्यांनी लष्करी तळाला पुन्हा एकदा ड्रोनने लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान बाळगत या ड्रोनवर २५ राऊंड फायरिंग करत ड्रोनला पिटाळून लावले. जम्मू येथील कालूचक लष्करी तळाजवळ रविवारी तीन वाजता हे ड्रोन घिरट्या घालत असल्याचे सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आले. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी या ड्रोनवर २५ फायरींग राऊंड केल्यानंतर अचानक हे ड्रोन गायब झाले. दरम्यान, सुरक्षा रक्षकांनी या भागात सर्च ऑपरेशन सुरू केले असून ड्रोनचा शोध घेण्यात येत आहे.

जम्मू हवाईदलाच्या तळावर रविवारी पहाटे दहशतवाद्यांनी ड्रोनद्वारे दोन बॉम्बहल्ले केले. या हल्ल्यात दोन अधिकारी जखमी झाले. यावेळी पहील्या स्फोटात कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या तांत्रिक विभागातील एकमजली इमारतीचे छत कोसळले.तर दुसरा स्फोट मोकळ्या मैदानात करण्यात आला होता. हे स्फोट कमी तीव्रतेचे होते. मात्र रडार यंत्रणेला चकवा देत ड्रोन आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून आत कसे आले व कुठे गायब झाले हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र याप्रकरणी लष्कर ए तोयबाच्या एका दहशतवाद्यास अटक करण्यात आली असून त्याच्या पाकिस्तानी साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -