Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश gadchiroli naxalites encounter: गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार

gadchiroli naxalites encounter: गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार

Related Story

- Advertisement -

गडचिरोलीतील एटापल्लीमध्ये झालेल्या बुधवारी सकाळी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले आहेत. एटापल्ली तालुक्यातील गट्टा-जांबिया पोलीस मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या जंगल परिसरात ही चकमक झाली होती. या चकमकीत ठार झालेल्या दोन नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत असून या जंगल परिसरात अजून काही नक्षलवादी लपले आहेत का याचा शोध घेत आहेत.

दरम्यान जांभिया-गट्टा पोलीस मदत केंद्रांवर काही दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास नक्षवाद्यांकडून पोलिसांवर गोळीबार करण्यात आला होता. तसेच पोलिसांवर एक हँडग्रेनेड फेकण्याचा प्रयत्नही झाला. यावेळी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत नक्षलवाद्यांनी पोलिसांना बाहेर येण्यास प्रवृत्त करत गोळीबार केला होता. मात्र पोलिसांनी सावध पवित्रा घेत नक्षवाद्यांचा डाव हाणून पाडला होता. दरम्यान पोलिसांकडून नक्षलविरोधी शोधमोहिम राबवली जात आहे.

- Advertisement -

यादरम्यान जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षवाद्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी पोलिसांकडूनही नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले. या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. नक्षलवाद्यांनी २६ एप्रिलला अहेरी तालुक्यातील मेडपल्ली येथील रस्त्याच्या कामावरील वाहनांची जाळपोळ केली होती.


 

- Advertisement -